आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Day Dream To Come In Power Seeing By BJP Sonia Gandhi

दिवसाढवळ्या खुर्चीचे स्वप्न बघतात भाजप नेते - सोनिया गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरगोन/रिवा - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील खरगोन व रिवा शहरांत प्रचारसभांत भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. नाव न घेता त्या म्हणाल्या, ‘भाजपच्या नेत्यांना दिवसाढवळ्या खुर्चीची स्वप्ने पडत आहेत. खुर्चीच्या लालसेपोटी ते परस्परांची मानहानी करण्याची एकही संधी दवडत नाहीत.’
सोनिया म्हणाल्या, भाजपचे हे नेते फक्त झोकदार गप्पा मारतात. करत काहीच नाहीत. त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. जनसेवेसाठी रात्रंदिन समर्पणाची भावना पाहिजे. मात्र ही मंडळी दिवसरात्र फक्त खुर्चीच्या लढाईत रमलेली आहे. भाजपला दोन वेळा संधी मिळाली. मात्र त्यांनी शेतकरी व सर्वसामान्यांना क्लेशाशिवाय काय दिले? जनता भाजपच्या कुशासनास वैतागली आहे. मध्य प्रदेशात खनिज, दारू व जंगल माफिया सरकार चालवत आहेत.
केंद्राचा पैसा कुणाच्या खिशात गेला : सोनिया गांधींनी रिवात सांगितले, केंद्र सरकारने राज्याला भरपूर निधी दिला. मनरेगासाठी खूप पैसा दिला. मात्र तो कुणाच्या खिशात गेला? या पैशाने भाजप नेते व भ्रष्ट अधिका-यांचीच प्रगती झाली. आरोग्य विभाग कर्मचा-यांच्या घरांवरील धाडींत अब्जांवधींचे घबाड मिळाले आहे. 13 मंत्र्यांविरुद्ध लोकायुक्तांकडे खटले दाखल आहेत. मात्र सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही.