आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Body Of Young Girl Found In Madhya Pradesh

खड्ड्यात आढळला तरुणीचा मृतदेह, हातावर गोंदले आहे, विष्णु संग रजनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडड्यातील तरुणीचा मृतदेह. इनसेट हातावर लिहिलेले नाव. - Divya Marathi
गडड्यातील तरुणीचा मृतदेह. इनसेट हातावर लिहिलेले नाव.
देवास/इंदूर - रविवारी सकाळी देवास जिल्ह्याच्या सिदनी विजयपूर गावात तलावाजवळ खड्ड्यात एका तरुणीचा मृतदेह पुरलेला आढळल्याने एकच गोंधळ उडाला. अज्ञात हल्लेखोराने या महिलेची हत्या करून मृतदेह गड्ड्यात पुरला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

आधी साडी दिसली, मग हात
देवास जिल्ह्यापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील ही घटना आहे. रविवारी सुमारे 10 वाजता एक व्यक्ती तलावापासून जात होता. त्यावेळी त्याला काही तुटलेल्या बांगल्या दिसल्या. जवळच एक खड्डा दिसला. तो खड्डा नुकताच तयार करण्यात आल्याचे दिसत होते. त्यामुळे त्याला शंका आली. त्याने गावातील लोकांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सांगण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी खड्ड्याजवळची माती हटवण्यास सुरुवात केली. काही वेळात साडी आणि हात दिसला. त्यानंतर जवळपास पाच फूट खोदल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

हातावर गोंदले आहे, विष्णु संग रजनी
पोलिस अधिकारी आरडी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तरुणीची ओळख पटलेली नाही. तिचे वय साधारण 20-22 वर्षादरम्यान असू शकते. तिच्या दागिन्यांवरून ती विवाहित असल्याचे जाणवते. तिच्या डाव्या हातावर विष्णु संग रजनी लिहिलेले आहे. प्राथमिकदृष्ट्या ती शेजारच्या गावातील असल्याचा अंदाज आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो...