आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्‍त राष्‍ट्राकडून पत्रकार अक्षय सिंह यांच्‍या संशयास्‍पद मृत्‍यूची दखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - व्यापमं घोटाळयाचे वृत्तांकन करताना पत्रकार अक्षय सिंह यांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूची संयुक्त राष्ट्राने दखल घेतली आहे. अक्षय सिंह यांच्‍या मृत्‍यूचे खरे कारण शोधून काढा आणि निष्‍पक्ष तपास करा असे अावाहन तपास यंत्रणांना करण्‍यात आले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विभागाच्या महासंचालक इरीना बोकोव्हा यांनी याबाबत आवाहन केले अाहे. सिंह कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्‍यांनी म्हटले आहे. पत्रकारांना काम करण्‍यासाठी सुरक्षित वातावरण असावे, समाजात कायद्याचे राज्‍य असावे. पत्रकारांविरोधात कोणी गुन्‍हा करत असेल, तर त्‍यांना शिक्षा व्‍हायलाच हवी असेही बोकोव्‍हा यांनी म्‍हटले आहे.
अक्षय सिंह (वय 38) हे एका वृत्‍तवाहिनीसाठी शोध पत्रकारिता करत होते. देशभरात सध्‍या गाजत असलेल्‍या मध्‍यप्रदेशातील व्‍यापमं घोटाळ्याच्‍या सूत्रधारांचा शोध घेत असताना जुलैच्‍या सुरूवातीलाच त्‍यांचा संशयास्‍पद मृत्‍यू झाला होता. व्यापमं घोटाळयाशी संबंधित असलेल्‍या 47 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.