आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांपूर्वी दिली होती मृत्यूला हुलकावणी, मात्र तशाच विमान दुर्घटनेत झाले निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय गांधी आणि माधवराव सिंधिया - Divya Marathi
संजय गांधी आणि माधवराव सिंधिया
ग्वाल्हेर - माजी केंद्रीय मंत्री आणि सिंधिया राजघराण्याचे राजे माधवराव सिंधिया यांची आज पुण्यतिथी आहे. 1980 मध्येच त्यांच्यासोबत दुर्घटना झाली असती मात्र तेव्हा त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली होती. मात्र बरोबर 21 वर्षांनी त्यांना विमान अपघातातच मृत्यू आला. 30 सप्टेंबर 2001 रोजी दिल्लीहून कानपूरला जाताना त्यांच्या विमानाने पेट घेतला आणि त्यात त्यांचे निधन झाले. 21वर्षांपूर्वी मृत्यू त्यांच्या जवळून गेला होता. जाणून घेऊ या काय होती ती घटना.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी हे माधवराव सिंधियांचे जवळचे मित्र होते. माधवरावांचा दिल्लीतील जास्तीत जास्त वेळ संजय यांच्यासोबतच जात होता. संजय गांधींना उड्डाणाची आवड होती. मे 1980 मध्ये इंदिरा गांधींचे निकटवर्तीय धीरेंद्र ब्रम्हचारींनी संजय यांच्यासासाठी पीट्स एस हे छोटे विमान विदेशातून मागवले होते. दिल्लीतील सफदरजंग विमानतळावर विमान अॅसेम्बल करण्यात आले आणि फ्लाइंग क्लबला देण्यात आले. 20 जून 1980 रोजी क्लबच्या निरीक्षकांनी विमानातून उड्डाण करुन पाहिले त्यानंतर 21 तारखेला संजय यांनी विमानाची पहिली ट्रायल घेतली. 22 जून रोजी त्यांनी आई इंदिरा, पत्नी मनेका, आर.के.धवन आणि धीरेंद्र ब्रम्हचारी यांना घेऊन 40 मिनिटे उड्डाण केले. त्याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधान निवासस्थानात बसलेल्या माधवराव सिंधियांना त्यांनी उद्या आपण विमानाने दिल्लीची सैर करु असे सांगितले होते.
पुढील स्लाइडवर वाचा, माधवराव का जाऊ शकले नाही संजय गांधींसोबत...