आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिग-21 च्या कॉकपिटमध्ये बसल्या डिफेन्स मिनिस्टर, असा होता अंदाज- Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - नुकत्याच संरक्षणमंत्री  झालेल्या निर्मला सीतारामण यांनी बॉर्डर एरियाच्या उत्तरलाई एअरबेसचा दौरा केला. या दौऱ्यात त्या एअरफोर्सच्या मिग-21 या अत्याधुनिक विमानाच्या कॉकपिटमध्ये बसल्या आणि एव्हिएशन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
- निर्मला सीतारमण अशा दुसऱ्या संरक्षण मंत्री आहेत, ज्या 16 वर्षांनी उत्तरलाई एअरबेसवर पोहोचल्या. 2001 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी या एअरबेसचा दौरा केला होता.
- बाडमेर जिल्ह्यातील उत्तरलाई एअरबेसला 1971च्या युद्धात विकसित करण्यात आले होते. हा परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जातो. संरक्षणमंत्री सीतारमण यांच्यासह वायुसेना प्रमुख बीएस धनोआही होते.
- एअरबेसवर अधिकाऱ्यांसह बातचीत केल्यानंतर त्या सरळ त्या ठिकाणी पोहोचल्या जेथे लढाऊ विमाने ठेवली जातात. हा एअरबेस प्रामुख्याने मिग 21 बाइसनचा बेस आहे.
 
कॉकपिटमध्ये बसल्या डिफेन्स मिनिस्टर
- संरक्षणमंत्र्यांनी मिग-21 मध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर त्यांना अधिकाऱ्यांनी विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवले. कॉकपिटमध्ये बसून त्यांनी एअरफोर्सच्या एव्हिएशन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
- उल्लेखनीय आहे की, जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री होते तेव्हा याच मिग एअरक्राफ्टमध्ये एका पायलटसह त्यांनी आकाशात उड्डाण घेतले होते. त्या काळी अनेक अपघात होत असल्याने मिग विमानाला उडणारी शवपेटी म्हटले जात होते.
 
स्लाइड्समध्ये पाहा, कॉकपिटमध्ये बसलेल्या संरक्षणमंत्र्यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...