आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 7 तासांपूर्वी 7 फेरे घेतलेल्या दाम्पत्याने एकमेकांच्या मीठीत घेतला अखेरचा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर/देवास - देवास मक्सीरोडवर गुरुवारी सकाळी झालेल्या या भीषण दुर्घटनेत नववधू-वरासह सात जण मृत्यूमुखी पडले. लग्नाच्या सप्तपदीनंतर अवघ्या सात तासांत वधूला घरी घेऊन जात असताना वधू-वरांची कार एका ट्रकला धडकली. धडक एवढी भीषण होती की कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. वधू-वराने एकमेकांच्या मीठीत अखेरचा श्वास घेतला. त्याच अवस्थेत त्यांचे मृतदेह कारमध्ये आढळून आले.

- बुधवारी उशिरा रात्री इंदूर येथील शिवनारायण ठाकूर यांची मुलगी रुपाचे लग्न तिल्लौर येथे दिनेशसोबत झाले.
- लग्नानंतर दिनेश आणि त्याचे कुटुंबिय वधू रुपाला घेऊन शाजापूर जिल्ह्यातील मदानाकडे कारने निघाले होते.
- मदानाकडे परतत असताना गुरुवारी सकाळी साधारण 11 वाजता दरम्यान त्यांची कार पिपलिया रस्त्यावर एका ट्रकवर जाऊन आदळली.
- अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्यातील सर्वजण त्यात अडकले.
- स्थानिकांच्या माहितीनुसार, काच आणि दरवाजा तोडून मोठ्या कष्टाने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
- कारमधील सर्व जागेवरच गतप्राण झाले होते.
- या दुर्घटनेत दोन मुली, तीन महिलांसह सातजण ठार झाले.
- घटनेनंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे, पोलिसांनी ट्रक जप्त केला असून ड्रायव्हरचा शोध सुरु आहे.
- सर्व मृतदेह देवास येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये बघा, या भीषण दुर्घटनेचे फोटो... अशी ट्रकवर धडकली होती कार.... विखुरले मृतदेह.....