आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadnavis Laugh After Listen Himself As Mp Cm

देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अन् हास्यस्फोट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - येथे गुजराती भवनात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ६६ व्या दोनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. या वेळी महाजन यांचे स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. परंतु निवेदकाने त्यांचा उल्लेख मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असा केला. त्या वेळी सुमित्रा महाजन देवेंद्र फडणवीस त्यांचे हसू रोखू शकले नाहीत. निवेदकाने नंतर चूक सुधारत त्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा केला, परंतु तोवर सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले होते.
...तर लोकसभा अध्यक्षांसमोर प्रतिस्पर्धी नसेल : अनौपचारिक चर्चेत महाजन यांनी सांगितले की, ब्रिटिश पार्लमेंटची नियमावली मागवली आहे. त्यातील नियमानुसार लोकसभा अध्यक्ष पुढच्या वेळी निवडणूक लढवत असेल तर त्यांच्याविरुद्ध उमेदवार देण्याची परंपरा तेथे आहे. आपल्याकडेही अशा पद्धतीचा विचार होऊ शकतो.

आगामी काळात लोकसभा पेपरलेस झालेली पाहायला मिळेल. त्यासाठी सर्व खासदारांना लॅपटॉप आयपॅड दिला आहे. संसद परिसरात नेट कनेक्टिव्हिटी देऊन कामे ऑनलाइन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक - फडणवीस : यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे २१ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होईल. शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल अशा महापुरुषांची स्मारके भव्यदिव्य असावीत. त्यात भेदभाव असू नये, असे फडणवीस म्हणाले.
इंदूर मनमाड रेल्वेसाठी सुमित्रा महाजनांचा पुढाकार : लोकसभाअध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी इंदूर मनमाड रेल्वेमार्गासाठी पुढाकार घेण्याची घोषणा केली. त्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सर्व खासदारांची एक बैठक घेणार असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभूही त्याला उपस्थित असतील. या रेल्वेमार्गाचा निर्णय लवकर व्हावा असे आपल्याला वाटते, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कार्यक्रमाची आणखी छायाचित्रे