आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे नेपाळ राजघराण्याची राजकुमारी, EX-CM च्या नातवाची आहे पत्नी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवयानी सिंह - Divya Marathi
देवयानी सिंह
भोपाळ - मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांची 5 नोव्हेंबर रोजी जयंती आहे. त्यानिमीत्ताने divyamarathi.com त्यांच्यासंबंधीत फारशी उजेडात न आलेली माहिती शेअर करत आहे. या मालिकेत आज आम्ही सांगत आहोत अर्जुनसिंह कुटुंबातील नातसून देवयानी सिंह यांच्याबद्दल. देवयानी यांचे ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याशीही नाते आहे. देवयानी यांचा जन्म 1972 मध्ये नेपाळच्या राणा राज घराण्यात झाला. त्या नेपाळच्या पशुपती समशेर जंग बहादूर राणा यांच्या कन्या आहेत. राणा घराण्याचे 1846 मध्ये नेपाळवर राज्य होते.

नेपाळमध्ये जन्मलेल्या कुवराणी देवयानी राज्या लक्ष्मी यांचे शिक्षण अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. काठमांडू येथील एका कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. 2007 मध्ये देवयानी यांचा विवाह सिंहरौलीचे राजकुमार कुंवर एश्वर्यसिंह यांच्यासोबत झाला. एश्वर्यसिंह हे अर्जुनसिंहाची मुलगी वीनासिंहचे चिरंजीव आहेत.    
 
देवयानीचे सिंधिया घराण्याशी नाते
देवयानी यांची आई उषा राजे सिंधिया ग्वाल्हेर घराण्याच्या महाराणी विजयाराजे सिंधिया आणि महाराज जीवाजीराव सिंधियांची कन्या आहे. देवयानीचे वडील पशुपति समशेर जंग बहादूर राणा नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे अध्यक्ष आहेत.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, देवयानी राणा यांचे फोटोज...