आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपाय बांधलेले- तोंडात बोळा काेंबलेला, दूर पडलेले होते कपडे; 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेप आणि खुनानंतर मुलीला झुडपात फेकून देण्यात आले. - Divya Marathi
रेप आणि खुनानंतर मुलीला झुडपात फेकून देण्यात आले.
इंदूर - भोपाळ गँगरेपचे प्रकरण अजून शांत झालेले नाही, तेवढ्यात देवासमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे सुंद्रेलमध्ये वडिलांना जेवण द्यायला निघालेली 13 वर्षीय मुलाचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला आहे. तिच्या शेतापासून अर्धा किमी अंतरावर मृतदेह आढळला. नराधमांनी हातपाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून तिच्यावर बलात्कार केला आणि मग खून केला. तिचे कपडे दूर पडलेले होते. रेप आणि खुनाची माहिती मिळताच सोवारी मोठ्या संख्येने लोक पोलिसांत पोहोचले आणि निदर्शने केली. काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला आहे.
 
असे आहे प्रकरण...
- रविवारी सुंद्रेल गावातील रहिवासी हरिओमला त्याच्या शेताजवळ एका मुलीचा मृतदेह आढळला. जवळ जाऊन पाहिले तर ती नग्न होती आणि तिचे हातपाय तसेच तोंड बांधलेले होते. यानंतर त्याने आसपासच्या शेतकऱ्यांना याची माहिती दिली.
- पोलिस इन्स्पेक्टर सी.एल. कटारे यांनी पथकासह तेथे धाव घेतली. मुलीचा मृतदेह मिळाल्याचे कळताच शेतावर गावकऱ्यांची गर्दी होऊ लागली. यादरम्यान मृत मुलीचे वडीलही तेथे पोहोचले. मुलीचा चेहरा पाहताच त्यांनी मोठ्याने आक्रोश केला.
 
रोज जायची वडिलांना जेवण द्यायला, घरापासून शेत होते 3 किमी
- मुलीच्या वडिलांनी सांगितले की, शाळेनंतर मुलगी संध्याकाळी 5 वाजता घरातून बाहेर पडायची आणि परत घरी जायला 7 वाजत होते. शेत घरापासून 3 किमी अंतरावर आहे. घटनेच्या दिवशी ती घरातून जेवणाचे सामान घेऊन निघाली, पण ती शेतावर पोहोचली नव्हती. यामुळे त्यांना काळजी वाटली. दुसऱ्या दिवशी नातेवाइकांकडे त्यांनी चौकशी केली. ज्या शेतात तिचा मृतदेह आढळला, ते वडिलांच्या शेतापासून अर्धा किमी अंतरावर आहे. तिला 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत.
 
रिपोर्टवरून कळेल किती होते आरोपी 
- एसपी अंशुमान सिंह म्हणाले, प्रारंभिक तपासात कळले की, मुलीचा खून दुष्कर्मानंतर झाला आहे. पीएम रिपोर्टमधूनच हे स्पष्ट होईल की किती लोक होते. वेगवेगळ्या टीम गठित करण्यात आल्या आहेत. कडक कारवाई केली जाईल.
 
फॉरेन्सिक टीमचा जबाब : श्वास कोंडल्याने 36 तासांपूर्वी झाला मृत्यू
- फॉरेन्सिक अधिकारी श्वेता देशमुख म्हणाल्या, मुलीचा मृत्यू तब्बल 36 तासांपूर्वी झाला आहे. शरीरावर जखमांचे व्रण आहेत. तोंडात बोळा कोंबून खून झाल्याचा संशय आहे. हे प्रकरण बलात्काराशी निगडित आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...