आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग तीन निवडणुका जिंकणारे मुख्यमंत्री काँग्रेसकडेही: दिग्विजय सिंहांचा मोदींना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - सलग तीन निवडणुका जिंकणारे मुख्यमंत्री काँग्रेसमध्येही आहेत, अशा शब्दांत सरचिटणीस दिग्विजय यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. आपल्या दावाच्या पुष्ट्यर्थ दिग्विजय सिंहांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित व आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे उदाहरण दिले. मोदी यांनी आपल्या यशाबाबत दीक्षित व गोगोई यांच्यासोबत वाद-विवादात भाग घ्यावा. कॉँग्रेसला मोदींची चिंता व भीतीही वाटत नाही, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी व त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्री अमित मित्रा यांच्याविरुद्ध एसएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीस दिल्ली पोलिस जबाबदार असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी गैरवर्तन करावयाला नको होते. ममता मुख्यमंत्री असल्याने पोलिसांनी सुरक्षात्मक उपाय योजणे आवश्यक होते, असे सिंह म्हणाले.

भाजप नेत्या उमा भारती यांनी मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे पिंडदान केले जाईल, असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिंह म्हणाले, उमा भारती यांनी पहिल्यांदा मध्य प्रदेश भाजपमधील स्थान जाहीर करावे.