आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींना भाजपने इतिहास शिकवण्‍याची गरज- दिग्विजय सिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- देशाच्‍या ऐतिहासिक घटनांबाबत नरेंद्र मोदींच्‍या ज्ञानावर कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले असून आपल्‍या पंतप्रधान पदाच्‍या उमेदवाराला भाजपने इतिहास शिकवण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

आझाद नगर येथे एका प्रचार सभेत बोलताना त्‍यांनी भाजप आणि मोदींवर हल्‍ला चढवला. ते म्‍हणाले, आजकाल भाजप मोदी फिव्‍हरने ग्रस्‍त आहे. परंतु, आमच्‍या इथे 12वी मध्‍ये शिकवल्‍या जाणा-या देशाचा इतिहासही भाजपच्‍या पंतप्रधानपदाच्‍या उमेदवाराला माहित नाही.

भाजपने मोदींना इतिहास शिकवला पाहिजे. जेणेकरून त्‍यांना देशाचा इतिहास माहित होईल. मोदी हे फेकू नंबर एक असून मी त्‍यांचे 300 खोटे विधाने एकत्रित केले आहेत. त्‍यांचा हा खोटेपणा मी लवकरच फेसबुक आणि ट्विटरवर अपलोड करणार आहे.