आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digvijaya Singhs Son Jaivardhans Tilak Ceremony Held In Raghav Garh

दिग्विजयसिंह यांचे आमदार पूत्र जयवर्धनसिंह यांचा तिलक, यूपीचे राजाभैय्या विशेष पाहुणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस महासचिव दिग्विजयसिंह यांचे चिरंजीव आमदार जयवर्धनसिंह यांचा तिलक मंगळवारी त्यांच्याच मतदारसंघात अर्थात राघोगड येथे झाला. त्यांचा विवाह बिहारच्या डुमरिया येथील राजघराण्यातील श्रीजम्या सोबत होणार आहे. तिलक सोहळ्याला देशातील प्रमुख राजघराण्याशी संबंधीत आणि राज्यातील अनेक आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते. त्यात उत्तर प्रदेशचे माजी मंत्री राजाभैय्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. माजी आमदार प्रियव्रत सिंह देखील उपस्थित होते. जयवर्धनसिंह यांची होणारी पत्नी श्रीजम्या डुमरीया राजघराण्याचे शत्रुंजय शाही यांची मुलगी आहे. शत्रुंजय शाही यांचे वडील रणविजय शाही राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार आहेत.
दुन स्कूल आणि अमेरिकेत झाले जयवर्धनचे शिक्षण
जयवर्धनसिंह याचा जन्म 9 जुलै 1982 रोजी झाला. त्याला मध्यप्रदेशात कुंवर या नावाने ओळखले जाते. कुंवरचे प्राथमिक शिक्षण दुन स्कूलमध्ये झाले त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर जयवर्धन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेला. तेथून परतल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला आहे.

दिग्विजयसिंह यांचे आजोळ बिहारमध्ये
काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजयसिंह यांचे बिहारसोबत जुने नाते आहे. त्यांचे आजोळ बिहारमध्ये आहे. मुलाचा विवाह बिहारमध्ये होऊ घातल्यानंतर या नात्याला पुन्हा एकदा उजाळा मिळत आहे. जयवर्धन सिंह यांची सासूरवाडी डुमरीया उत्तरप्रदेश राज्यात आहे मात्र हा भाग बिहार सीमेवर आहे.
दिग्विजयसिंहांची नव्हती मुलाला राजकारणात आणण्याची इच्छा
दिग्विजय सिंह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. काँग्रेसमध्ये ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात, मात्र मुलगा जयवर्धनसिंह याला ते राजकारणापासून दूर ठेवू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी त्याला अमेरिकेला शिक्षणासाठी पाठविले होते. पण परिस्थिती अशी आली, की त्यांनाच जयवर्धनसिंहला राजकारणात पाय रोवून उभे राहाण्याचे शिक्षण द्यावे लागले. निवडणूक लढविण्याआधी त्यांनी मुलाला राघोगडची पदयात्रा करायला लावली होती. डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जयवर्धनसिंह राघोगड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आमदार जयवर्धनसिंह यांच्या तिलक कार्यक्रमाची छायाचित्रे