आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disputed Statements, BJP Leaders, MP Raghunandan Shukla, Ratlam

'मुलींना लग्नाआधी मोबाईल देऊ नका, जीन्समुळे दिसते महिलांची फिगर'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रतलाम- मध्यप्रदेश सरकारमधील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये करण्याची सवय काही थांबता थांबत दिसत नाहीये. यापूर्वीही अनेक भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन चौहान सरकारला अडचणीत आणले होते. कधी महिलांवर, कधी सहकारी मंत्र्यांवर तर कधी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वादग्रस्त शेकी करीत पक्षाबरोबरच हे नेतेही अडचणीत आले होते. दरम्यान, प्रत्येक वेळी चौहान यांनी दुर्लक्ष केल्याने हे मंत्री सतत प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी राहिले एवढे मात्र खरे.

प्रदेश भाजप विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. अशावेळी पक्षातील नेते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. नागरी प्रशासन मंत्री बाबूलाल गौर हे गोव्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला गेले असता क्रूजवर पार्टी करताना दिसून आले. तर, रविवारी राज्यसभेच्या खासदाराने महिलांवर आपत्तीजनक टिप्पणी केली.


राज्यसभेचे खासदार व प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष रघुनंदन शर्मा यांनी सल्ला दिला आहे की, मुलींना लग्नाच्या पूर्वी मोबाईल देवू नका. तसेच मुलींनी व महिलांनी जीन्स पँट घालू नये. कारण जीन्स पँट घातली तर महिलांची फिगर दिसते.
पुढे वाचा, रघुनंदन शर्मा काय-काय म्हणाले, क्लिक करा...