आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disrespect Of National Flag At Khandwa Near Indore Mp

वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशीच तिरंग्याचा अपमान; 7 तासांपर्यंत फडकत होता क्षतिग्रस्त तिरंगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साडे सात तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर फडकत होता क्षतिग्रस्त तिरंगा
इंदोर/खंडवा - देशभरात 22 जुलैला भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशीच बुधवारी खांडवा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंग्याचा अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. येथे 7 तासांपर्यंत क्षतिग्रस्त तिरंगा फडकत होता. जेव्हा आमच्या टीमने अधिकार्‍यांना क्षतिग्रस्त तिरंगा दाखवला तर सर्वत्र गोंधळ उडाला. यानंतर मिनिटात तिरंगा बदलण्यात आला.

दुपारी 1.15 वाजता जिल्हाधिकारी आपल्या कार्यालयात होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारताची शान असलेला तिरंगा फाटलेल्या अवस्थेत फडकत होता. सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कामात मग्न होते. कोणालाही या फाटक्या तिरंग्याबद्दल काहीच माहिती नव्हते.
दुपारी 1.16 वाजता जेव्हा आमचे पत्रकार आणि कॅमेरामन यांची नजर तिरंग्यावर पडली तेव्हा त्यांनी त्याचे छायाचित्र घेतले. कॅमेरा पाहताच कर्मचार्‍यांनी मिनिटात छताकडे धाव घेतली आणि तिरंग्याला खाली उतरवले. दुपारी 1.30 वाजेपर्यंत कर्मचार्‍यांनी नवीन तिरंगा चढवला. मात्र हे करतानाही ते कॅमेर्‍याला चुकवण्याच्याच प्रयत्नात होते.
क्षतिग्रस्त ध्वज उतरवल्यानंतर दुपारी 1.32 वाजेपर्यंत नवीन राष्ट्रध्वज जिल्हाधिकार्यालयावर दिमाखात फडकत होता. तिरंगा बदलल्यानंतर कर्मचार्‍यांच्या जीवात जीव आला.
तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया
राष्ट्रध्वजाच्या अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंतची शिक्षा

राष्ट्रध्वज कायदा 1971नुसार राष्ट्रध्वजाचा अपमान हा गुन्हा ठरतो. फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 मध्ये ज्या ज्या कारणांमुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकतो त्या सर्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. ध्वजाचा अपमान केल्यास संबंधीत व्यक्तीला 3 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
- अलोक सेठी, खांडवा
हा आहे नियम
जर कोणत्याही शासकीय कार्यालयावर फडकणारा तिरंगा क्षतिग्रस्त, मळालेला अथवा फिकट रंगाचा झालेला असेल तर त्यास लगेच बदलायला हवे. उतरवण्यात आलेल्या तिरंग्याचे कोण्याएका व्यक्तीच्या हस्ते एखादा मोठा दगड बांधून पाण्यात विसर्जन करण्यात यावे अथवा एकट्यानेच त्यावर अग्निसंस्कार करावा.
पुढील स्लाईडवर पाहा, कशाप्रकारे बदलला कर्मचार्‍यांनी क्षतिग्रस्त राष्ट्रध्वज...
(सर्व फोटोः जयमूर्ती पिल्ले)