आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi's Computer Traning A Confidence Increase Medium

‘दिव्य मराठी'चे संगणक प्रशिक्षण, आत्मविश्वास वाढवण्याचे माध्यम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - ‘दिव्य मराठी'तर्फे ज्येष्ठ नागरिक व गृहिणींसाठी आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क संगणक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आतापर्यंत सुमारे ७००० पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. या उपक्रमातील पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. ३० ते ८० वर्षांपर्यंतचे स्पर्धक प्रचंड उत्साहाने यात सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षण त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचे माध्यम बनले आहे.

पहिल्या टप्प्याची नोंदणी बंद झाली आहे. दुस-या टप्प्यात काही शहरांत नोंदणी लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. जवळपास तीन महिने चालणा-या या प्रशिक्षणात १२,००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक, महिलांना संगणक प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षण घेत असलेल्या नागरिकांचे म्हणणे असे की त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्याला नवी दिशा देण्याची संधी मिळेल, तर बहुतांश महिलांनी प्रशिक्षणात संगणकाचे बेसिक ज्ञान घेतल्यानंतर नवे काम, व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न बाळगले आहे.
पुढे वाचा प्रतिक्रिया..