आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० फूट उंच बाल्कनीतून पडून भोपाळमध्ये डॉक्टरचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - ४० फूट उंच बाल्कनीतून पडल्याने डॉ. अखिलेश मिश्रा यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. अपघाताच्या वेळी ते तिसऱ्या मजल्यावरील मित्राच्या बाल्कनीतून चादरीच्या साहाय्याने दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या बाल्कनीत उतरत होते. त्यांची ४ वर्षांची मुलगी फ्लॅटच्या खोलीत चुकून बंद झाली होती. तिची सुटका करण्यासाठी ते बाल्कनीत उतरत असताना चादरीवरचा हात निसटल्याने ते जमिनीवर पडले.

डॉ. मिश्रा (३३) जाटखेडी येथील रुची लाइफ स्केपमध्ये बी-ब्लॉकच्या फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये पत्नी संगीता, चार वर्षांची मुलगी सान्वी आणि १८ महिन्यांचा मुलगा सानिध्य यांच्यासोबत राहत होते. गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजता सान्वी मास्टर बेडरूममध्ये गेली. तेथे खेळत असताना तिच्याकडून चुकून दरवाजा बंद झाला. काही वेळाने अखिलेश यांनी तिला आवाज दिला तेव्हा ती झोपली होती. दरवाजा न उघडल्याने ते पळतच तिसऱ्या मजल्यावरील डॉ. राजेश ढोबळे यांच्या फ्लॅटवर गेले. राजेशने दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यांच्या हातात चादर होती. त्यांनी घाईघाईत ग्रिलला चादर बांधली. ते काय करताहेत हे मला समजलेच नाही. दरम्यान, ते चादर पकडून त्यांच्या बाल्कनीत उतरत होते तेवढ्यात त्यांचा चादरीवरचा हात सुटला आणि बाल्कनीला धडकून अखिलेश जमिनीवर काेसळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याची वार्ता मुलीस नव्हती. तिने सकाळी पापा कोठे आहेत? असा प्रश्न विचारताच सोसायटीतील सर्व नागरिक हेलावले होते.
बातम्या आणखी आहेत...