आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctor Woman Lodged Complaint Against Husband Over Dowry

पती डॉक्टर पत्नीला म्हणायचा, तुझ्यासाठी मुलगा शोधून आणतो, दुसरे लग्न कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- पती-पत्नीमधील नाते अतिशय नाजूक असते. बऱ्याच वेळा पैशांच्या हव्यासापोटी ते एवढे गुंतागुंतीचे होऊन बसते की सोडवणे अवघड होऊन जाते. एका डॉक्टर महिलेने पती आणि सासु-सासऱ्यांवर आरोप लावला आहे, की हुंड्यासाठी माझा छळ केला जातो. मी त्यांची मागणी ऐकली नाही तर पती म्हणतो, की तुझ्यासाठी मुलगा शोधून आणतो. तुझे दुसरे लग्न लावून देतो. या प्रकरणी महिलेने पोलिस तक्रार दाखल केली आहे.
या महिलेचे नाव प्रीती आहे. ती होमियोपॅथिक डॉक्टर आहे. तिच्या पतीचे नाव प्रकाश आहे. माहेरुन 15 लाख रुपये आणण्यासाठी प्रकाश आणि त्याचे आईवडील दबाव टाकतात, असे प्रीतीने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. माझे लग्न लावून देण्यासाठी प्रकाश फारच उत्सूक आहे. तो मला कायम हे सुनवत असतो, असे तिने म्हटले आहे.
दोघांचे कोर्टमॅरेज
शिक्षण सुरु असताना प्रीती हॉस्टेलमध्ये राहायची. यावेळी हॉस्टेलमधील एका मैत्रिणीचा भाऊ प्रकाश याच्यासोबत तिची मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेम झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी जुलै 2014 मध्ये एका मंदिरात लग्न केले. लग्न झाल्यावरही प्रकाशने ही गोष्ट घरच्यांना सांगितली नाही. जेव्हा त्यांना लग्नाचे समजले तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी प्रीतीला स्वीकारण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली. एवढेच नव्हे तर प्रीतीच्या आईला आणि बहिणीला मारहाणही केली.
पुढील स्लाईडवर बघा, प्रकाश आणि प्रीतीचे फोटो.....