आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्गामुळे कवटीचे हाड मोडले, बनवली सिमेंटची कवटी, प्रकृतीत सुधारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - छत्तीसगडमध्ये राजधानी रायपूरपासून ५० किलोमीटर दूरवरील भाटापारा येथे एका ग्रामस्थाच्या डोक्यात सिमेंटची कवटी बसवण्यात आली आहे. इन्फेक्शन झाल्याने त्याच्या कवटीच्या हाडाची वेगाने झीज होत होती. तेव्हा डॉक्टरांनी माथ्यापासून कानाच्या मागील भागापर्यंत कवटीचा भाग गोलाकार कापला. त्याच आकाराचं सिमेंटचे आवरण तयार करून तेथे बसवण्यात आले. अशा प्रकारची ही देशातील पहिली, तर जगातील दुसरी शस्त्रक्रिया ठरली आहे. यापूर्वी अमेरिकेत २०१४ मध्ये तशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया करून दोन आठवडे झाले असून रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारत आहे.

ही कठीण शस्त्रक्रिया व डोक्याच्या कवटीची निर्मिती करणाऱ्या डॉक्टरांनी अशा स्वरूपाची ही देशातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा केला आहे. ज्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्याचे नाव चंद्रमोहन असून त्याचे प्राण वाचवण्यासाठी दुसरा कुठलाच उपाय उरला नाही तेव्हा डॉक्टरांनी सिमेंटची कवटी बनवण्याचा पर्याय निवडला. या शस्त्रक्रियेनंतर चंद्रमोहनच्या डोक्यात कपाळापासून डोक्याच्या मागील भागापर्यंत २५ सेंटिमीटरची कवटी हाडांनी बनलेली नाही, तर पूर्णपणे सिमेंटची आहे.

चंद्रमोहनला पाहिल्यानंतर कुणाला अंदाजही बांधता येत नाही की त्याच्या डोक्यात सिमेंटची खोपडी बसवली आहे. न्यूरो सर्जन डॉ. किशोर झा यांनी सांगितले की, ही शस्त्रक्रिया खूप जोखमीची होती. ती सहा तास चालली. त्याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन ती करण्यात आली.
बाइकवरून पडल्याने झाला अपघात
भाटापारा येथील चंद्रमोहन हा तरुण बाइकवरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता. मानेलाही दुखापत झाली होती. त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले. रुग्णाच्या मानेत त्रास होत होता. तो शस्त्रक्रियेमुळे कमी झाला. परंतु काही दिवसांनी डोक्याचा काही भाग काळा पडताना दिसला. पुन्हा तपासणी करण्यात आली. प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने इन्फेक्शन दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्याच्या डोक्यात पू जमा झाला होता. त्यामुळे डोक्याचे सीटी स्कॅन व एमआरआय तपासणी केली गेली. त्यात इन्फेक्शन हाडापर्यंत पोहोचल्याचे लक्षात आले.
कवटी बनवणे, लावणे कठीण
डाॅ. झा यांनी सांगितले की, बोन सिमेंट पॉली मिथाइल मिथा क्रिलेटच्या थरापासून बनते. ते एक प्रकारचे पावडर, पेस्ट व केमिकलपासून पेस्ट बनवून त्यापासून अवघ्या तीन मिनिटांत बनवले जाते. त्यानंतर त्याला आकार देऊन संबंधित ठिकाणी फिट केले जाते. त्याला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. परंतु पेस्ट तयार केल्यानंतर सिमेंटमधून गरम गॅस बाहेर पडतो. त्याच्या गरमीमुळे मेंदूला इजा पोहोचू शकते. त्यामुळे पेस्ट तयार केल्यानंतर पाच मिनिटांच्या आत त्याला कवटीचा आकार देऊन ते फिट करण्यात आले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...