आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याने पळत होते कुत्रेे, ताेंडात होता नवजात मुलीचा मृतदेह; नेऊन पिलांपुढे टाकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुत्रा बाळाचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून असा पळत होता. - Divya Marathi
कुत्रा बाळाचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून असा पळत होता.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात अमानवीयतेचा एक घृणास्पद प्रकार दिसला. सोमवारी एका कुत्रा आपल्या तोंडात नवजात बालकाचा मृतदेह घेऊन पळताना दिसला. कुत्र्याने नवजात बाळाचा मृतदेह झुडपात नेला आणि आपल्या छोट्या पिलांसमोर टाकला. पिलांनी नवजात बाळाच्या मृतदेहाचे लचके तोडून विद्रूप केले. नवजात बाळ मुलगी होती. हे बाळ कुत्र्याला कुठे आढळले? बाळाचे आईवडील कुठे आहेत? यासह इतर प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत.

> सूत्रांनुसार सकाळी 11.30 वाजता बस स्टँडपासून जिल्हा रुग्णालयात जाणाऱ्या रोडवर वाटसरूंना एका नवजात बाळाच्या मृतदेहाला भटका कुत्रा घेऊन पळताना दिसला. लोकांनी या कुत्र्याचा पाठलाग केला आणि गोपाळगंज पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली.
> मृतदेह घेऊन कुत्रे गोपाळगंजच्या स्मशानभूमीजवळील झुडपात गेले. येथे श्वानाच्या पिल्लांनी मृतदेहाचे लचके तोडून ते विद्रूप केले. कुत्र्याच्या मागोमाग अनेक वाटसरूही पळतपळत तेथे पोहोचले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 
> गोपाळगंज पोलिसांनी घटनेनंतर दोन कुटुंबांची चौकशी केली. परंतु, या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या मृत जन्मलेल्या मुलींना गावी जाऊन दफन केल्याची माहिती दिली आहे.
> वास्तविक, सुल्तानगंज येथील रामावती रामकुमार पाटकर आणि चकेरी बिनैका येथील सपना राजेश पाल यांनीही एका दिवसापूर्वीच मृत मुलींना जन्म दिला होता. यामुळे पोलिसांनी या कुटुंबांवर संशय व्यक्त केला आहे.

जिल्हा रुग्णालय आणि बीएमसी परिसराजवळ आढळणारे कुत्रे नरभक्षक झाले आहेत. या घटनेआधीही रुग्णालयाच्या आवारात आढळणारे कुत्रे मांसाचे तुकडे आणि मृत नवजातांना तोंडात धरून पळताना आढळलेले आहेत.


काय म्हणतात पोलिस?
> कुत्र्यांच्या तावडीतून मृतदेह हस्तगत करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. कुत्र्यांनी मृतदेहाचा काही भाग खाल्ला आहे. काही लोकांची यासंबंधी चौकशी केली असून, अद्याप मृत बाळाच्या कुटुंबीयांचा शोध लागलेला नाही.
- संजय सिंह सोनी, टीआय, गोपाळगंज पोलिस स्टेशन

 

काय म्हणतात डॉक्टर?
> एका दिवसापूर्वीच दोन कुटुंबातील महिलांनी येथे मृत मुलींना जन्म दिला होता. दोन्ही कुटुंबांना मृतदेह सोपवण्यात आले होते. जर या कुटुंबांपैकी कुणी मृतदेह फेकला असेल, तर अमानवीय आहे. घटनेबाबत कळल्यावर आम्ही चौकशी केली आहे.
- डॉ. अरुण सराफ, सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, सागर.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...