आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंमत आली अंगलट, कुत्र्याचे आधारकार्ड बनवणारा ऑपरेटर गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्‍यप्रदेश) - भिंड जिल्‍ह्यात आधार कार्ड बनवणार्‍या एका ऑपरेटरने गंमती-गंमतीत कुत्र्याचे आधारकार्ड बनवले, ही गंमत त्‍याच्‍या चांगलीच अंगलट आली असून त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात अाला आहे. सध्‍या तो तुरूंगाची हवा खात आहे.

भिंड जिल्‍ह्यातील ऊमरी गावात आधार नोंदणी केंद्रावर काम करणारा ऑपरेटर मोहम्मद अाजम खान याने हे कृत्‍य केले आहे. कुत्र्याच्‍या आधार कार्ड तपशीलानूसार टफी असे या कुत्र्याचे नाव आहे, तर मोती त्‍याच्‍या पित्‍याचे नाव दाखवण्‍यात आले आहे. त्याचे वय दोन वर्ष, जन्‍म तारीख 4 जून 2013 आणि पत्‍ता - वार्ड क्रमांक 14, मोहल्ला - नवलपूरा, उमरी, जिल्‍हा भिंड आदी तपशीलही या कुत्र्याच्‍या आधार कार्डवर देण्‍यात आला आहे.
असे आले प्रकरण समोर
भोपाळमध्‍ये आधार कार्ड बनवणारी संस्था आय सेक्‍टच्‍या कार्यालयातून केंद्र संचालक अखिलेश यादव यांच्‍याशी संपर्क करण्यात आला. यामुळे हे प्रकरण समोर अाले आहे. त्‍या ऑपरेटर विरोधात आईटी कायद्यांतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला व त्‍याला तुरूंगात डांबण्‍यात आले आहे.
पोलिसांसमोर काय म्हणाला आजम खान
भिंड ये‍थील नोंदणी केंद्रात पोलिस जेव्‍हा आजम खान याला अटक करण्‍यासाठी गेले तेव्‍हा तो म्‍हणाला, 'गाय अाणि हनुमान यांचे आधार कार्ड तयार होऊ शकतात; मग कुत्र्यांचे का नाही ?' नंतर आपला गुन्‍हा कबूल करताना तो म्‍हणाला की, कौटूंबिक समस्‍यांमुळे आपण अस्‍वस्‍थ होतो त्‍यामुळे माझ्याकडून ही चूक झाली