महू - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जन्मस्थळ महूत त्यांना अभिवादन केले. या वेळी ते म्हणाले, डाॅ. आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो.
मोदींनी महू येथून ‘ग्रामोदयातून भारत उदय’ माेहिमेचा प्रारंभही केला. दुसरीकडे काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, गेल्या ६० वर्षांत नेहमी गरीब-गरीब म्हणणाऱ्यांनी काय केले? ६० वर्षे या दिग्गज दलित नेत्याच्या वारशाचा अवमान केल्याबद्दल काँग्रेसने खरे तर पश्चात्ताप करायला हवा. आमचे सरकार या महान नेत्याची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने काम करेल.
संयुक्त राष्ट्रसंघात प्रथमच आंबेडकर जयंती
संयुक्त राष्ट्रसंघात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यूएनडीपीच्या प्रशासक हेलेन क्लार्क म्हणाल्या, वंचितांसाठी बाबासाहेब हे एक वैश्विक प्रतीक आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राष्ट्रसंघ कटिबद्ध आहे.