आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण्यांच्या देवीच्या दर्शनाला राज ठाकरे, राजकारणातील अपयशाने अध्‍यात्‍माकडे वळाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दतिया - राजकारणात सातत्याने अपयश येत असल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे आता अध्यात्माकडे वळाले आहेत. मध्य प्रदेशातील दतियाच्या माँ बगलामुखी देवीचे दर्शन घेऊन अभिषेक करण्यासाठी राज बुधवारी येथे पोहोचले. गुरुवारी ते श्री पीतांबरा पीठावर विधिवत पूजा करतील. तसेच अतिशय प्राचीन मंदिर असलेल्या खडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन जलाभिषेक करतील.
 
बगलामुखी देवी हे देशभरातील राजकारण्यांचे श्रद्धास्थान आहे. राजकारण तसेच विविध क्षेत्रात अपयश आलेले लोक देवीचे दर्शन घेऊन यश प्राप्त करतात, अशी या देवीची सर्वदूर अाख्यायिका सांगितली जाते. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मोर्य यांच्यासह अनेक दिग्गजांनी या देवीचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली होती.
बातम्या आणखी आहेत...