आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या काही मिनिटांत तपासल्या जाणार उत्तरपत्रिका, गैरप्रकार टाळण्यासाठी कॉम्प्युटरची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायसेन - मध्यप्रदेशात आता बोर्ड परीक्षेच्या पेपर्सची तपासणी शिक्षक करणार नाहीत, तर हे कामदेखील संगणकाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे पेपर्सची तपासणी अतिशय कमी वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. संगणकाद्वारे पेपर तपासणी करण्यासाठी उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर मॉडेल उत्तरांच्या आधारे संगणक संबंधित विद्यार्थ्याचे पेपर तपासून ते बरोबर आहेत की चूक हे सांगणार आहे. या प्रक्रियेत केवळ वेळेचीच बचत होणार आहे असे नव्हे तर सदोष पेपर तपासणीमुळे विद्यार्थ्यांवर होणारा अन्यायही थांबणार आहे. त्याचबरोबर “अर्थपूर्ण’ व्यवहारांनाही आळा बसणार आहे.
परीक्षेच्या काळात शिक्षक आंदोलन करून शिक्षण मंडळास वेठीस धरण्याचे प्रकार दरवर्षी होत असतात.त्यामुळे निकाल रखडतो. या इतर समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने “रुक जाना नही’ योजनेअंतर्गत नवा प्रयोग केला आहे. या योजनेअंतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळ खुल्या प्रक्रियेतून घेणार आहे. परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांची तपासणीदेखील संगणकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात थायलंडहून आणलेल्या स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनमध्ये उत्तरपत्रिका स्कॅनिंग करून त्यांचा डाटा फीड करण्याचे काम सुरू अाहे. या मशीनची किमत लाख ६० हजार रुपये इतकी आहे.

१२ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग होणार
“रुकजाना नही’योजनेअंतर्गत दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यात दहावीच्या हजार तर बारावीच्या हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. हे स्कॅनिंगचे काम दिल्लीची कंपनी अॅप्टेकला देण्यात आले आहे. कंपनीने चार कर्मचारी नेमून उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू केले आहे. या मशीनवर दररोज ३०० पेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्याचा संपूर्ण डाटा राज्य मंडळाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नोटांप्रमाणे होते स्कॅनिंग
उत्कृष्ट विद्यालयात बोर्डाच्या परीक्षांमधील उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यासाठी मशीन बसवण्यात आले आहे. हे मशीन अवघ्या काही मिनिटांत उत्तर पत्रिकांची तपासणी त्यांची पाने नोटांप्रमाणे तपासून त्याचे स्कॅनिंग पूर्ण करणार आहे.

संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक राहणार
“रुकजाना नही’ योजनेअंतर्गत पहिल्यांदाच उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. त्यांची तपासणीही प्रथमच संगणकाद्वरे करणे शक्य होणार आहे. जिल्हा मुख्यालयात उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यासाठी थायलंड येथून ही मशीन मागवण्यात आली आहे. तिचे काम योग्य प्रकारे सुरू आहे. या प्रक्रियेमुळे निकालात पूर्ण पारदर्शकता राखता येणार आहे. बी.के. शर्मा, प्रभारी, रुक जाना नही योजना, रायसेन
बातम्या आणखी आहेत...