आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ending Examination Candidate Get Answer Paper Mail

परीक्षा संपताक्षणी उमेदवारास मेलवर मिळेल उत्तरपत्रिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - रेल्वे मंत्रालयाने रेल्वे भरती परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्णपणे ऑनलाइन परीक्षा प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ज्युनियर इंजिनिअर व ज्युनियर सेक्शन इंजिनिअरच्या सात हजार रिक्त पदांसाठी आॅगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा होणार आहे. त्याची प्रक्रिया २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

रेल्वेने वर्षभरापूर्वीच अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली होती. आता प्रश्नपत्रिका जारी करण्यापासून उत्तरपत्रिका सोडवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. इंजिनिअर्स पदांसाठी होत असलेल्या पहिल्या पूर्णपणे ऑनलाइन परीक्षेसाठी २७ जून रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यासाठी अर्जदार २६ जुलैपर्यंत अर्ज दाखल करू शकतील. त्याची माहिती वेबसाइटवर देण्यात आले

नव्या व्यवस्थेचे हे फायदे असतील
>प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळी उत्तरे मिळतील.
>लाखो प्रश्नांची प्रश्नपेढी तयार करुन त्यातून प्रश्नपत्रिका तयार केली जाईल.
>शहरांत आरआरबी सेंटर असेल तर देशातील कोणत्याही विभागासाठी उमेदवार ऑनलाइन परीक्षा देऊ शकतील.
>बोटांच्या ठशांद्वारे होणार उमेदवाराची ओळख
>उत्तरपत्रिका तपासण्यात गती येणार व ३० दिवसांत निकाल जाहीर होणार.

जवळपास १५ लाख अर्ज
ऑनलाइन परीक्षेसाठी रेल्वे मंत्रालय देशातील नामांकित संस्थांसोबत बोलणी करत आहे. एजन्सीला एकाचवेळी १.७ लाख उमेदवारांच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका तपासण्याची सुविधा द्यावी लागेल. रेल्वेच्या अपेक्षेनुसार या ७ हजार पदांसाठी देशभरातून १५ लाखांच्या आसपास अर्ज प्राप्त होतील. त्यामुळे परीक्षांचे आयोजन ठरलेल्या दिवशीच तीन टप्प्यांत करण्याचे नियोजन सुरू आहे.

उत्तरपत्रिकेच्याही ३ प्रती असतील
ऑनलाइन परीक्षेचा मोठा लाभ म्हणजे उत्तरपत्रिकेची प्रत परीक्षार्थीला ऑनलाइन मिळू शकेल. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर ती सबमीन करताना उत्तरपत्रिकेच्या तीन प्रती तयार होतील. रेल्वे बोर्ड, तपास संस्था उमेदवाराच्या ई-मेलवर या कॉपी फॉरवर्ड होतील. त्यामुळे गैरप्रकार थांबतील.

प्रवेशपत्रापासून सर्व काही ऑनलाइन
पहिल्यांदाच उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. यात मोबाइल क्रमांक व ईमेल अॅड्रेस घेतले जाणार आहेत. रेल्वे भरती मंडळ (आरआरबी) प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यापर्यंतच्या सर्व सूचना ऑनलाइनच पाठवणार अाहे.