आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Student Raped By Boyfriend At Ujjain In Madhya Pradesh News In Marathi

बॉयफ्रेंडने बनवला BE Student चा अश्लील व्हिडिओ, मित्रांनी केला गॅंगरेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पोलिसांनी अटक केलेले तीन आरोपी)
उज्जैन- मध्य प्रदेशातील इंज‍िनीयरिंगच्या एका विद्यार्थिनीवर सामुहीक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बॉयफ्रेंडसह त्याच्या तीन मित्रांनी हे कृत्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले असून एक आरोपी फरार आहे. बलात्कार करण्यापूर्वी पीडितेचा तिच्या बॉयफ्रेंडने अश्लील व्हिडिओ बनवला होता. नंतर चौघांनी पीडित विद्यार्थिनीवर आळीपाळीने सामुहीक बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुख्य आरोपी पीडितेचा बॉयफ्रेंड आहे. मागील ऑक्टोबर महिन्यापासून आरोपी पीडितेला कोल्ड्रिंकमधून गुंगींचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करत होता. आरोपीचे अन्य मित्र पीडितेचा अश्लील व्हिडिओ बनवत होते. एवढेच नव्हे तर अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करू, अशी धमकी देऊन आरोपी पीडितेवर वारंवार अत्याचार करत होते. मु्‍ख्य आरोपीसह त्याच्या तीन मित्रांनी पीडितेवर दोन महिन्यांत अनेकदा बलात्कार केला आहे.

एका स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने पीडितीने पोलिसांनी 'आपबिती' सांगितली. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून चौथा आरोप फरार आहे. आरोपींकडे अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आरोपींचे फोटो...