आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Escaped Arrest By The Police: Not Found At Home, The Assembly Arrived

सेक्स सीडी प्रकरण : मध्यप्रदेशचे माजी अर्थमंत्री अखेर पोलिसांच्या ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - नोकरासोबत ठेवलेले अनैसर्गिक संबंध आणि सीडी प्रकरणी माजी अर्थमंत्री राघवजी यांना अखेर अटक करण्यात आले आहे. हबीबगंड पोलिसांनी त्यांना जून्या भोपाळमधील एका रिकाम्या फ्लॅटमधून ताब्यात घेतले आहे. हा फ्लॅट त्यांच्या नातेवाईकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषम्हणजे राघवजी आत असताना या फ्लॅटला बाहेरून कुलूप ठोकण्यात आलेले होते. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस राघवजींचा शोध घेत होते.

मोबाईलच्या लोकेशनवरुन लागला पत्ता

राघवजी फरार असल्याने पोलिसांनी दोन दिवसांपासून त्यांचा मोबाईल क्रमांक सर्विलांसवर टाकलेला होता. त्याआधारे मंगळवारी त्यांचे लोकेशन कळाले. कोहेफिजा येथील राजश्री अपार्टमेंटमध्ये फ्लॅट क्रमांक 102 मध्ये ते लपून बसले होते. पोलिसांनी राजश्री अपार्टमेंटवर छापा मारला तेव्हा त्या फ्लॅटला बाहेरून कुलूप लावलेले होते. परंतू पोलिसांना मिळालेले मोबाईल लोकेशन त्याच फ्लॅटचे असल्याने कुलूप तोडून पोलिस आत घुसले, त्यावेळी तिथे राघवजी यांच्यासोबत त्यांची पत्नी उपस्थित होती. हा फ्लॅट त्यांच्या नातेवाईकाचा असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी राघवजींना अटक केली तेव्हा त्यांनी थोडा देखील विरोध केला नाही. हसत हसत ते गाडीत बसले.

त्यांना हबीबगंज पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आल्यानंतर तिथे त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.