आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवासचे आमदार तुकोजीराव पवार यांचे निधन, आज अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुकोजीराव पवार (फाईल फोटो) - Divya Marathi
तुकोजीराव पवार (फाईल फोटो)
देवास-इंदूर- देवास संस्थानचे राजे तथा सलग सहावेळा आमदार राहिलेले तुकोजीराव पवार (५२) यांचे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास निधन झाले.

मंगळवारी बाथरूममध्ये ते पाय घसरून पडल्यानंतर त्यांना इंदुरच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रेन डेड झाल्यामुळे त्यांना जीवनरक्षा प्रणालीवर ठेवण्यात आले होते. परंतु त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.भाजप नेते पवार यांचे पार्थिव देवास येथील राजवाड्यात अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता छत्रीबाग येथे अन्त्यसंस्कार केले जातील. पवार यांनी १९८५ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

२००२ मध्ये ते भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. १९९० मध्ये ते पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. पवार यांनी निवडणुकीत कधीही पराभव पाहिला नव्हता. त्यांनी मध्य प्रदेश सरकारमध्ये उच्च शिक्षण, पर्यटन, क्रीडा व तरूण विभागाचे मंत्रिपद सांभाळले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, फोटो...
बातम्या आणखी आहेत...