आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Exclusive Photos Of Cylinder Blast In Madhya Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: सकाळचा नाश्ताच ठरला अखेरचा, फेकले गेले मृतदेह, पडला प्रेतांचा सडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोट झाल्यानंतर स्थानिक नागरिक लगेच घटनास्थळी गोळा झाले. - Divya Marathi
स्फोट झाल्यानंतर स्थानिक नागरिक लगेच घटनास्थळी गोळा झाले.
पेटलावद (मध्य प्रदेश)- झाबुआ जिल्ह्यातील पेटलावदमध्ये आज सकाळी 8.30 वाजता एका हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटात 80 पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले असून सुमारे 150 जखमी झाले. स्फोट एवढा भयंकर होता, की आजूबाजूची घरेही जमिनदोस्त झाली. यानंतर सर्वत्र केवळ रक्ताने माखलेले लोक आणि जमिनीवर पडलेले मृतदेह नजरेत येत होते. जखमींनी सुरवातीला पेटलावदच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. आता जवळच्या शहरांमध्ये हलविण्यात येत आहे.
सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. परंतु, येथील इमारतीत स्फोटके लपवून ठेवली होती. त्यांचा स्फोट झाल्याचे मृतांचा आकडा वाढला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हा दहशतवादी हल्ला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हवेत फेकले गेले मृतदेह
नागरिक हॉटेलमध्ये सकाळच्या नाश्ता करीत होते. जवळच बसस्टॅंड असल्याने प्रवाशांची मोठी संख्या होती. यावेळी अचानक स्फोट झाला. त्यानंतर या हॉटेलसमोरुन जाणारे लोक अगदी हवेत दगड फेकावेत तसे फेकले गेले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. चार अर्थ मुव्हर्सच्या मदतीने राडारोडा हटविण्यात येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, स्फोटाच्या ठिकाणचे विदारक फोटो.... असा पडला मृतदेहांचा सडा....