आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ मेळ्याच्या आधीच उज्जैनमध्ये सापडला मोबाइल लिक्विड बॉम्ब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन- सिंहस्थ मेळ्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. ट्रेजर मार्केटसमोरील एका खासगी बॉइज हॉस्टेलच्या एका खोलीतून पोलिसांनी दोन किलो वजनाचामोबाइल लिक्विड बॉम्ब निकामी केला. मोबाइलशी कनेक्ट केलेला बॉम्ब एका बागेत ठेवला होता. सोबतच जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर सापडले आहे.

सिंहस्थ मेळ्यात साखळी बॉॅम्बस्फोट घडवण्याचा होता कट...
- सूत्रांनुसार मिळालेली माहिती अशी की, एका मोबाइलशी हा बॉम्ब कनेक्ट करण्‍यात आला होते. मोबाइलवर कॉल (फोन) येताच बॉम्बस्फोट झाला असता.
- या प्रकरणाचा एटीएस तपास करत आहे.
- आगर येथील राहाणार्‍या एका युवकने दोन दिवसांसाठी हॉस्टेलची खोली क्र. 212 घेतली होती.
- साजिश वाहिद ( 30) असे त्याचे नाव आहे. होस्टेलमध्ये त्याने ओळखपत्र म्हणून आधार कार्ड जमा केले होते.
- हॉस्टेलमध्ये तो एक काळी बॅग घेऊन आला होता. हॉस्टेलचे मालक सेतु जैन यांनी सांगितले की, जेवण करून येतो असे सांगून तो गायब झाला.
- रात्रीचे दोन वाजले तरी तो न आल्याने सेतु जैन यांनी पोलिसांना माहिती दिली.

शनिवारी होस्टलमध्ये पोहोचले पोलिस...
- शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत साज‍िश वाहिद होस्टेलमध्ये पोहोचला नाही. पोलिसांनी त्याच्या खोलीचे कुलप तोडले. खोलीची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत स्फोटके आढळून आली. जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर मिळाले.
- एडीजी व्ही. मधुकुमार यांनी सांग‍ितले की, चौकशी सुरु आहे.


पुढील स्लाइडवर वाचा, कसा बनवला जातो लिक्विड बम?
बातम्या आणखी आहेत...