आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या नावाने केली Online मैत्री, IT इंजिनिअरने घरी जाऊन तरुणीला भोसकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - महू येथील सॉफ्टवेअर इंजीनिअर अमित यादवने (24) मंगळवारी 16 वर्षीय प्रिया रावतचा खून केला. अमितने मुलीच्‍या नावाने बनावट फेसबूक आयडी तयार करून तिच्‍याशी मैत्री केली. ही बाब प्रियाच्‍या लक्षात येताच तिने त्‍याला ब्लॉक केले. त्‍या नंतर अमित चर्चा करण्‍याच्‍या बहाण्‍याने तिच्‍या घरी आला आणि त्‍याने तिच्‍यावर चाकूने तब्‍बल 12 वार केले. यात तिचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला. विशेष म्‍हणजे हा प्रकार प्रियाच्‍या आईसमोरच घडला.

- अमित घरी आला. काही कळायच्‍या आत त्‍याने चाकूने प्रिया आणि तिच्‍या आईवर वार करायला सुरुवात केली.
- शेजाऱ्याने सांगितले, प्रियाच्‍या घरातून आरडा - ओरडा ऐकून फ्लॅट नंबर 201 मध्‍ये राहणाऱ्या महिलेने गेट उघडले. तिच्‍या समोरच आरोपीने प्रियाच्‍या घरातून पळ काढला. त्‍यासाठी त्‍याने दुसऱ्या मजल्‍यावरून खाली उडी मारली.
- उडी मारल्‍याने त्‍याचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला. परिणामी, तो तिथेच पडून राहिला.
- शेजाऱ्यांनी 100 नंबरवर कॉल करून माहिती दिली.
- पोलिस तत्‍काळ घटनास्‍थळावर आले. त्‍यांनी आरोपीला रुग्‍णालयात भरती केले.
- पोलिसांनी सांगितले, अमितने प्रियाचे डोके, कान आणि पोटात चाकूने तब्‍बल 12 वार केले होते. यातच तिचा मृत्‍यू झाला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार असलेल्‍या प्रियाच्‍या आईने सांगितला थरार...
बातम्या आणखी आहेत...