आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Falling From Railway, Tie Chapped Feets By Shirt

रेल्वेतून पडल्यानंतर कापलेले पाय स्वत:च्या शर्टने बांधले !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - हॅलो पोलिस... रेल्वेतून पडल्यामुळे माझे पाय कापले आहेत, कृपया लवकर या... आपल्या कापलेल्या पायांना स्वत: शर्टने बांधून पोलिसांना माहिती देण्याचे धैर्य अभियांत्रिकीचा विद्यार्थी चंदन झा याने दाखवले आहे. सोमवार-मंगळवारच्या रात्री १.३० वाजता हबीबगंज स्थानकाजवळ केरळ एक्स्प्रेसचा वेग कमी होताना तो उतरण्याच्या प्रयत्नात होता. त्याच क्षणी पाय घसरून पडला तेव्हा क्षणार्धात दोन्ही पायांचे तुकडे झाले.

चाक घासल्यामुळे गुडघ्याखालचे हाडही बाहेर निघाले होते. वेगात होणारा रक्तस्राव आणि सर्वत्र पसरलेला काळोख अशा वातावरणात त्याने स्वत:चा शर्ट काढून दोन्ही पाय एकत्र बांधले. याबरोबर त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनची माहिती दिली. जवळपास २० मिनिटांनंतर हबीबगंज पोलिसांनी तिथे जाऊन चंदनला रुग्णालयात दाखल केले. बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी असलेला चंदन टीआयटी कॉलेजमध्ये बीईच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचा मोठा भाऊ सुनील झाने सांगितले की, रविवारी तो स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिल्लीला गेला होता. दुर्घटनेनंतर चंदनने रात्री १.३० वाजता स्वत: फोन करून पोलिसांना माहिती दिली.

कर्मचा-यांनी रक्तदान केले
रुग्णालयातील डॉ. पांडे यांनी सांगितले की, दोन्ही पायांच्या शस्त्रक्रियेसाठी पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमला तीन तास लागले. शस्त्रक्रियेदरम्यान १० पिशव्या रक्त देण्यात आले. यासाठी रुग्णालयातील कर्मचा-यांनी रक्तदान केले आणि अन्य रक्तपेढीतून रक्त बदलून घेण्यात आले.