आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टात आलेल्‍या दाम्‍पत्‍यामध्‍ये वाद, पत्‍नीने मारलेल्या दगडाने पतीचा कापला कान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खांडवा - कौटुंबिक न्यायालयात घटस्‍फोटासाठी आलेल्‍या एका दाम्‍पत्‍यामध्‍ये चांगलेच वाद झाले. दोघांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली. पत्‍नीने पतीला दगड मारला, त्‍यात त्‍याचा कान कापल्‍या गेला. न्‍यायालयाच्‍या परिसराच पती रडत होता, मदतीसाठी लोकांना हाका मारत होता, पण कुणीही समोर आले नाही. कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या बाहेर सुमारे अर्धा तास ही मारहाण चालली.
मारहाणीत जखमी झालेला पती पोलिसात तक्रात दाखल करायला गेला. त्‍याच्‍या मागे पत्‍नीही नातेवाईकांना घेऊन आली. जखमी झालेल्‍या युवकाचे नाव विनोद किशोर पाल आहे. तो अतर या गावातील आहे. मूंदी खैगांव येथील सुंदरबाई नारायण पाल हिच्‍यासोबत त्‍याचा 30 एप्रिल 2011 मध्‍ये विवाह झाला होता. लग्‍नानंतर पत्‍नी सुंदरबाईला सासरी राहणे पसंत नव्‍हते. दोन आठवड्यातच ती माहेरी परतली. तेव्‍हापासून विनोद पाल हा न्‍यायालय आणि पोलिस स्‍टेशनचे उंबरठे झिजवत आहे. विनोदने माहिती दिली की, मी कौटुंबिक न्‍यायालयात घटस्‍फोटासाठी आलो. लग्‍नात मिळालेल्‍या सर्व भेटवस्‍तूही मी सोबत आणल्‍या. तेव्‍हा सुंदरबाई आणि तिचे नातेवाईक सामान पाहून भडकले. परस्‍परांमध्‍ये चर्चा करत असतानाच त्‍यांनी मारपीट सुरू केली. माझी पत्‍नी सुंदरबाईने दगड फेकून मारला त्‍यामध्‍ये माझा कान कापला गेला. मी जीव वाचवण्‍यासाठी धावत सुटलो. नाहीतर पत्‍नी, सासू, सासरे यांनी मला ठार मारले असते, असे विनोदने पोलिसांना सांगितले.

पत्नी म्‍हणाली, हा काहीच काम करत नाही
पत्नी सुंदरबाई म्‍हणाल्‍या, लग्‍न झाल्‍यानंतर आठ महिने विनोदसोबत सासरी राहिली, पण तो कोणताच काम-धंदा करत नाही. दिवसभर विनाकारण फिरत असतो. त्‍यामुळे आमच्‍यात वाद होतात. मी घटस्‍फोट घेण्‍याच्‍या निर्णयावर ठाम आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, जखमी पतीचे फोटो..