आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची छाती ५६ इंचांची, मोदींची नव्हे : ज्योतिरादित्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोरेना (मध्य प्रदेश)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नव्हे, तर शेतकऱ्यांची छाती ५६ इंची आहे. कारण शेतकरी सर्व संकटांवर मात करून आपले काम अथकपणे करत आहेत, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी लगावला आहे.

भाजप सत्तेवर आल्यापासून मध्य प्रदेशात अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाठीदेखील परिस्थिती वाईट आहे. शेतकरी प्रतिकूलतेमध्येही आपले काम चांगल्या प्रकारे करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती खऱ्या अर्थाने ५६ इंचाची आहे, असे ते म्हणाले. अंबा शहरातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ज्योतिरादित्य मार्गदर्शन करत होते. राज्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते.
बातम्या आणखी आहेत...