आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fate Of Cbi Probe In Vyapam Scam To Be Decided Today

\'व्यापमं\'चा तपास CBI कडे, सुप्रीम कोर्टाचे आदेश, राज्यपालांची उचलबांगडी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/भोपाळ- मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यायसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळा प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवार) दिले. त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या राज्यपालांना हटवण्याची मागणीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटिशीला पुढील चार आठवड्यात उत्तर देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

सीबीआय याप्ररणी सोमवारपासून तपास सुरु करणार अाहे. तपासाचा पहिला अहवाल सीबीआय 24 जुलैला होणार्‍या सुनावणीत कोर्टात सादर करणार आहे.

सहा टॉप वकिलांकडून युक्तिवाद...
व्यापमं घोटाळाप्रकरणाची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. देशातील सहा नामी वकिलांनी युक्तिवाद केला. यात कपिल सिब्बल, प्रशांत भुषण, विवेक तनखा, अभिषेक मनु सिंघवी, इंदिरा जयसिंग व केटीएस तुलसी यांचा समावेश आहे.
कपिल सिब्बल यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांना हटवण्याच्या मागणीच्या मुद्द्यावर कोर्टासमोर युक्तिवाद केला. राज्यपाल रामनरेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, मध्यप्रदेश हायकोर्टाने राज्यपाल यांना दिलासा दिला होता. मात्र, व्यापमंचे सीईओ यांनी आपल्या जबाबात राज्यपाल यांचा नामोल्लेख केला होता. विशेष म्हणजे या घोटाळ्यात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची होती, असेही म्हटले होता. यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारला नोटिस बजावून चार आठवड्यात उत्तर मागितले आहे.

दुसरीकडे, व्यापमं घोटाळा प्रकरणातील मृत्यूसत्रामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी 'पिंडदान योजना' सुरू करावी, असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी सकाळी दिवंगत टीव्ही जर्नालिस्ट (पत्रकार) अक्षय सिंह यांच्या कुटुंबियांची घेतली भेट घेतली. त्यांना मदतीचे आवाहन केले. व्यापमं घोटाळ्यांचे रिपोर्टिंग करताना अक्षय सिंह याचा मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा,व्यापमंच्या किरकिरमुळे पंतप्रधान नाराज