आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father And Son, Mentally Ill, Kept Chained For 20 Years

नायलाजास्तव तब्बल 20 वर्षांपासून साखळदंडात जखडून ठेवले आहे बापलेकांना!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरसिंहपूर - मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील कुटूंब प्रमुखालाच लोखंडी साखळीत बांधून ठेवण्याची एका कुटूंबावर वेळ आली आहे. कुटूंबप्रमुखासोबत त्यांचा लहान मुलाला देखील लोखंडी साखळीत बांधून ठेवावे लागत आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 20 वर्षांपासून या दोघांना नायलाजास्तव लोखंडी साखळीत बांधून ठेवले आहे. दोन्ही मानसिक रुग्ण आहेत.

मिळालेली माहिती अशी की, बरोदिया पिपरिया गावातील रहिवासी चुडामण कौरव (65) आणि त्यांचा लहान मुलगा वृजेश मानसिक रुग्ण आहेत. दोघांना 20 वर्षांपासून मानसिक आजार जडला आहे. परंतु करणार काय, कौरव कुटूंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. बापलेकांवर उपचार करण्‍यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे दोघांना लोखंडी साखळी बांधून ठेवण्याची वेळ कौरव कुटूंबियांवर आली आहे. सरकारी मदत न म‍िळाल्याने दोघांवर उपचार होऊ न शकल्याचा आरोप कौरव कुटूंबियांनी केला आहे. अखेर उज्‍जैन येथील एका सेवाभावी संस्थेने दोघांच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे.

दिनेश कौरव याने सांगितले की, त्याचे वडील चुडामण कौरव आणि लहान भाऊ वृजेश हे दोघांना मानसिक आजार असल्याचे निदर्शनास आले. द‍िनेशचे उत्पन्न महिन्याकाठी तीन हजार रुपये आहे. त्यात कुटूंबातील सात जण खाणारे. खाण्यापिण्यावर खर्च करावी की वडील आणि भावाच्या औषधीवर हे गणित न जमल्याने दोघांना घरातच लोखंडी साखळदंडात बांधून ठेवण्याची वेळ आली आहे.
जबलपूर आणि ग्वाल्हेरमधील रग्णालयात दोघांवर उपचार करण्‍यात आला. परंतु पैशाअभावी उपचार मध्येच बंद करावा लागला. साखळदंडातील जखडलेले चुडामन आणि वृजेश यांना कधी-कधी अंगणातही सोडले जाते. परंतु त्यानंतर मात्र त्यांना खोलीत बंद करून ठेवावे लागते.
मानसिक रुग्ण असलेले वडील आणि भावाला मोकळे सोडते तर ते इतरांचे नुकसान करतील. त्यामुळे त्यांना साखळदंडात बांधून ठेवावे लागते. काही दिवसांपूर्वी दिनेश याने साखळदंडात बांधलेले आपले वडील आणि भावाचे छायाचित्र जिल्हाधिकारी यांना दाखवले होते. त्यांच्याकडे व्यथा मांडली होती. परंतु त्यांच्याकडूनही कोणत्याच प्रकारची मदत होऊ शकली नाही. सरकारतर्फे मदत मिळाली असती तर दोघांवर उपचार करू शकलो असतो, असे दिनेशने म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, लोखंडी साखळदंडात बांधलेले चुडामण आणि वृजेशची छायाचित्रे...

(फोटो: साखळदंडात जखडलेले चुडामण कौरव)