आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडील म्हणाले, मृत्यूनंतरही जग पाहते माझी लाडकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - सहा वर्षांची एक निष्पाप, निर्व्याज मुलगी आपल्या आजारपणात तर हारली, मात्र मृत्यूच्या कुशीत चिरनिद्रा घेण्याअगोदर दोन जणांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशफुले पेरून गेली. कृष्णबाग कॉलनीतील रहिवासी साईनाथ वाडेकर यांची ६ वर्षांची मुलगी भव्याचा टायफाइडमुळे मृत्यू झाला. यामुळे अर्थातच पित्याच्या दु:खाला पारावार राहिला नाही. डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते.

भव्याने वडिलांना रुग्णालयात घेऊन जाताना सांगितले होते की, माझे डोळे बंद होऊ देऊ नका. त्याच वेळी पित्याने निर्णय घेतला होता की, काही अघटित घडलेच तर मी माझ्या मुलीचे डोळे कुणा गरजूला दान करीन, जेणेकरून कोण्या तरी अंधाच्या जीवनात प्रकाश येईल.

महिन्यापूर्वीच झाला होता वाढदिवस
भव्याचे वडील साईनाथ यांनी सांगितले की, ४ ऑगस्टला भव्याचा जन्मदिवस संपूर्ण कुटुंबाने उत्साहाने साजरा केला होता. तेव्हा कुणाला अंदाजही आला नसेल की हा तिचा शेवटचाच वाढदिवस असेल म्हणून. याच्या काही दिवसांनंतर तिला टायफाइड झाला. डॉक्टरांना दाखवूनही जेव्हा काही फायदा झाला नाही तेव्हा तिला गीता भवन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येत सुधारल्यामुळे दोन दिवस आधीच तिची रुग्णालयातून सुटी झाली होती. साईनाथ यांच्या म्हणण्याप्रमाणे शुक्रवारी उशिरा सायंकाळी तिची तब्येत अचानक बिघडली. याच वेळी नेमकी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा आम्ही तिला ऑटोरिक्षातून घेऊन गेलो. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.