आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Gets Capital Punishment For Killing Son And Daughter In Law

मुलगा-सुनेला जिवंत जाळले, फाशीची शिक्षा ऐकून मोठमोठ्याने हसले आरोपी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- मुलगा आणि त्याच्या पत्नीला जिवंत जाळून ठार मारणाऱ्या आईवडीलांना आणि त्यांच्या बहिणीला देवास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर आरोपींच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटतील असे वाटले होते. पण तिघेही न्यायालयात खदाखदा हसताना दिसले. या कृत्याचा त्यांना अजूनही जराही पश्चाताप झालेला नाही.
का केली होती मुलगा आणि सूनेही हत्या
6 मे 2014 रोजी दत्तोतर गावातील आरोपी रामप्रसाद याचे जमिन विकण्यावरुन मुलगा महेशसोबत कडाक्याचा भांडण झाले. यातून संतप्त झालेल्या रामप्रसाद याने बहिण द्रोपदी आणि पत्नी लक्ष्मी यांच्या मदतीने महेशची पत्नी सूमन हिच्या अंगावर रॉकेल ओतले. त्यानंतर तिला आग लावून दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महेशवरही रॉकेट ओतले. त्यालाही आग लावली.
तोंड न उघडण्याची धमकी
महेशची मुलगी शितलने सांगितले, की घटना घडली तेव्हा तिचा लहान भाऊ प्रविण आणि बहिणी राणीही तेथेच होते. त्यांना रामप्रसाद आणि लक्ष्मी यांनी बजावले, की जर कुणाला काही सांगितले तर तुम्हाला जिवे मारु. त्यांनी आधीच आमच्या आईवडीलांना ठार मारण्याचा कट रचला होता.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो.....