आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरा म्‍हणाला - तू GF आहे, आता बायको हो ! सुनेने बनवला ऑडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणी - Divya Marathi
पीडित तरुणी
भोपाळ/होशंगाबाद- मध्‍यप्रदेशातील इटारसी येथील भीलाखेडी येथे एक 50 वर्षीय व्‍यक्‍ती आपल्‍या नवविवाहित सुनेचा लैंगिक छळ करत होता. एवढेच नाही तर तो तिच्‍यासोबत मुद्दाहून अश्‍लील बोलत होता. या प्रकरणी पीडित तरुणीने मंगळवारी पोलिस अधीक्षकाकडे तक्रार दिली.

दोनच महिन्‍यांपूर्वी झाले लग्‍न...
नवविवाहितेने सांगितले, ''22 एप्रिल रोजी भीलाखेडी येथील एका युवकासोबत माझे लग्‍न झाले. लग्‍नाच्‍या काहीच दिवसानंतर सासऱ्याची माझ्यावर वाईट नजर पडली. तो माझ्याशी अश्‍लील बोलायला लागला. म्‍हणत होता, तू माझी गर्लफ्रेंड आहे आता लवकर पत्‍नी हो. सुरुवातीला मी त्‍याचे म्‍हणणे थट्टेने घेतले. परंतु, या नंतर त्‍याचे कारनामे वाढतच गेले'', अशी आपबिती पीडित तरुणीने सांगितली.

पतीनेही केली मारहाण

> सासरा आपल्‍याला त्रास देत असल्‍याचे तिने तिच्‍या पतीला सांगितले.
> परंतु, तू माझ्या वडिलांवर आळ घेत आहे, असे म्‍हणत त्‍याने तिला मारहाण केली.
> त्‍या नंतर तिने पुरावा म्‍हणून सासऱ्याचे बोलणे मोबाइल फोनमध्‍ये कैद केले.
> आपला भाऊ आणि वडिलांना सोबत घेऊन पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...