आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Killed Son And Injured Daughter In Family Tussle

PHOTOS: बायकोने जेवण न दिल्याने हैवान बापाने मुलीचे हात-पाय कापले, मुलाची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैवान बाप गजेंद्र वेल सिंह याने चिमुकल्याच्या डोक्यावर लोखंडी सळीने जोरदार प्रहार केला. - Divya Marathi
हैवान बाप गजेंद्र वेल सिंह याने चिमुकल्याच्या डोक्यावर लोखंडी सळीने जोरदार प्रहार केला.
इंदूर (मध्य प्रदेश)- बापावर कुटुंबाची देखभाल आणि रक्षणाची जबाबदारी असते. कुटुंबावर एखादे भयंकर संकट आले असेल तर बापाने हसत हसत जीव दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण या हैवान बापाने तर कहरच केलाय. बायकोने वेळेवर जेवण दिले नाही म्हणून चक्क दीड वर्षाच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या केली. त्यानेही या हैवानाचे समाधान झाले नाही. पोटच्या पोरीचे हात-पाय कापले. आता काय म्हणावे या बापाला. तो निश्चितच फाशीच्या लायकीचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हैवानाचे नाव गजेंद्र वेल सिंह असे आहे. त्याच्या पत्नीचे नाव कालीबाई आहे. कालीबाईने त्याला वेळेवर जेवण दिले नाही. त्यामुळे गजेंद्र संतापला. त्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यावर लोखंडी सळीने जोरदार प्रहार केला. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतरही त्याचे समाधान झाले नाही. त्याचा राग शांत झाला नाही. त्याने चिमुकल्या मुलीचा एक हात आणि एक पाय कापला. त्यानंतर तो कालीबाईला ठार मारणार होता. पण तिने कशी बशी त्याच्या तावडीतून सुटका करुन घेतली. शेजारच्या घरात ती लपून बसली. याची माहिती शेजाऱ्यांना मिळाल्यावर लोक गोळा झाले. त्यानंतर गजेंद्र पळून गेला.
दरम्यान, हात-पाय कापले असल्याने चिमुकल्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या हैवान बापाने काय केले चिमुकल्यांसोबत.... सूचना- पुढील स्लाईडवरील फोटो अत्यंत भयानक आहेत... ते तुम्हाला विचलित करु शकतात....