आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुली'वर 11 वर्षे करत राहिला बलात्कार, तरुणी आई बनल्यानंतर घडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानलेली मुलगी आणि आरोपी भगवतीलाल चिमुकलीसह. - Divya Marathi
मानलेली मुलगी आणि आरोपी भगवतीलाल चिमुकलीसह.
इंदूर - मंदसौरमध्ये एका बापाने आपल्या मानलेल्या मुलीवर 11 वर्षे अत्याचार केला. पीडितेने एका मुलीला जन्म दिल्यावर या अमानुष प्रकरणाला वाचा फुटली. पीडितेने जन्मलेल्या मुलीला त्याचे नाव द्यायला सांगितले तर आरोपीने दोघींना घराबाहेर हाकलले. यानंतर तरुणीने एसपींना तक्रार केली. मंगळवारी आरोपीविरुद्ध रेप आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
टीआय जितेंद्रसिंह सिसौदियांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीवरून गरोडा येथील भगवतीलाल ऊर्फ बाबू पाटीदारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध धमकावण्याच्या कलमांखालीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पीडितेने सांगितली अत्याचाराची हकिगत
- पीडितेने सांगितले, मी मनासा तालुक्यातील बर्डियाची राहणारी आहे. बाछडा समाजाचे बाहुल्य असल्याने गरोडा येथील भगवतीलाल पाटीदारचे येणे-जाणे असायचे. यादरम्यान, त्याची माझ्यावर वाईट नजर पडली. त्याने माझ्या आईवडिलांना तुमच्या मुलीच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जबाबदारी घेतो असे म्हटले. तेव्हा माझे वय 14 वर्षे होते आणि मी 8वीत शिकत होते. अभ्यासात हुशार पण आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने कुटुंबीयांनी मला त्याच्यासोबत पाठवले.
- आरोपी 7 मे 2007 रोजी मला मंदसौरच्या मेघदूतनगरमध्ये एका घरात नेले. ते त्याने विकत घेतलेले होते. म्हणाला- तू अजून अल्पवयीन आहेस म्हणून हे घर मुलाच्या नावाने खरेदी करत आहे, तू सज्ञान झाल्यावर तुझ्यावर नावावर करीन. 6 महिने त्याने मला मुलीसारखे सांभाळले. मग अचानक त्याची नियत बिघडली आणि त्याने अत्याचाराला सुरुवात केली.
- मी विरोध केल्यावर म्हणाला- मी इंटरनॅशनल तस्कर आहे, तुझ्या पूर्ण कुटुंबाला ठार मारू शकतो, तुलाही अफूच्या केसमध्ये फसवू शकतो. मोठमोठ्या नेत्यांशी माझी ओळख आहे. यामुळे मी प्रचंड भ्यायले होते. 2015 मध्ये मी गर्भवती झाले आणि 31 मार्च 2016 रोजी मनासाच्या एका प्रसूतिगृहात मुलीला जन्म दिला.
भगवतीलालने त्या दवाखान्यात कागदपत्रांमध्ये बापाच्या नावाच्या कॉलममध्ये पंकज नाव लिहायला लावले. मी मुलीला त्याचे नाव देण्यासाठी आणि घर नावावर करण्यासाठी म्हटले तर त्याने आम्हा दोघी मायलेकींना घराबाहेर हाकलले. मी मुलीला घेऊन गावी परतले आणि हिंमत करून एसपींना तक्रार दिली. आरोपीने मला बायकोसारखे वागवले. समाजात आणि मित्रांमध्ये कार्यक्रमात मला घेऊन जात होता. पण आता पत्नी मानायची वेळ आली तर हाकलून लावले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी काही फोटोज....
बातम्या आणखी आहेत...