आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Trying To Rape His Daughter , Mother Killed Him With Axe Indore Crime News In Marathi

मुलीची अब्रु वाचवण्यासाठी आईने कुर्‍हाडीने केला नराधम पतीच्या मानेवर वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: कुर्‍हाडीने पतीची हत्या करणारी फहमीदा)
इंदूर- मुलीची अब्रु वाचवण्यासाठी एक माता आदिशक्तीप्रमाणे धावून आल्याची घटना मध्यप्रदेशातील इंदूर शहरात घडली आहे. मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधम पतीवर पत्नीने कुर्‍हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. इंदूरमधील मारुती पॅलेस कॉलनीत ही घटना घडली. पतीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केले आहे.

फहमीदा असे आरोपी महिलेचे नाव असून रवी ऊर्फ चंप्या असे मृत व्यक्तीचे नाव आहे. फहमीदाने रवीच्या मानेवर कुर्‍हाडीने वार केला. तरी देखील त्याचा श्वास सुरु होतो. रवी पुन्हा उठेल आणि प्रतिहल्ला करेल, फहमीदा आणि पीडित मुलगीला भीती होती. त्यामुळे दोघी रात्रभर रवीच्या मृतदेहाजवळच बसल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी फहमीदा स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.
काय आहे प्रकरण?
फहमीदा बी हिने पहिल्या पतीला घटस्फोट देऊन ती रवीसोबत राहात होती. फहमीदाला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. मुलगी देखील फहमीदा आणि रवीसोबत राहात होती. परंतु, रवीची फहमीदाच्या मुलीवर वाईट नजर होती. मंगळवारी (31मार्च) रवीने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. फहमीदाने रवीला रंगेहात पकडले. फहमीदा संतापली आणि तिने कुर्‍हाडीने रवीच्या मानेवर वार केला. रवी गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर रवी उठून प्रतिवार करेल म्हणून फहमीदा आणि पीडित मुलगी रवीजवळ बसल्या होत्या. अखेर तब्बल सहा तासांनंतर रवीचा मृत्यू झाला.
आधी डोळ्यात टाकले मिरचीचे पाणी...
चंदन नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी विनोद दीक्षित यांनी सांगितले की, मंगळवारी फहमीदा आणि तिची मुलगी घरात काम करत होत्या. तितक्यात रवी घरी आला. त्याने फहमीदाच्या मुलीची छेड काढली. फहमीदाने त्याला विरोध केला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तरी देखील रवी मुलीला सोडण्यास तयार होत नव्हता. फहमीदा प्रचंड संतापली. स्वयंपाक घरातील मिरची पूड पाण्यात मिसळली आणि ते पाणी रवीच्या डोळ्यात टाकले. तेव्हा कुठे रवीने फहमीदाच्या मुलीला सोडले. नंतर फहमीदाने घरात ठेवलेली कुर्‍हाडीने रवीच्या मानेवर वार केला.
दरम्यान, फहमीदाने सांगितले की, पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर ती आणि तिची मुलगी रवीकडे राहायला आले. सुरुवातील रवी मुलीला स्वत:च्या मुलीप्रमाणे वागणूक देत होता. परंतु नंतर रवीची नियत बिघडली. तो पीडितीकडे वाईट नजरेने पाहात होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित व्हिडिओ अणि फोटो...