आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनी महिला IAS ठरली अश्लीलतेची शिकार; म्हणाली, भारतात जन्म घेतला हेच चुकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिवनी (भोपाळ)- मानवाधिकार आयोगाच्या सदस्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करणारी ट्रेनी महिला आयएएस अधिकारी रिजु बाफनाने 'आपबिती' कथन केली आहे. 'भारताच जन्म घेतला हेच चुकले. देशात कोणत्याही महिलेने जन्म घेऊ नये', असेही रिजू बाफना यांनी 'फेसबुक'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र,पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल होताच त्यांनी रात्री उशीरा नवी पोस्ट करून खेद देखील व्यक्त केला आहे.

'रागाच्या भरात आपण काय लिहिले, हेच कळले नाही. एका नराधमासाठी संपूर्ण देशाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. माझा देशावर पूर्ण विश्वास आहे.', असेही रिजू यांनी म्हटले आहे.
बाफणा यांनी सांगितले की, मानवाधिकार आयोगातील अधिकार्‍याविरुद्ध तिने एफआयआर दाखल केली होती. त्याने तिला अश्लील मेसेज पाठवले होते. तिच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी भारत यादव यांनी करवाई करून आरोपीला तडकाफडकी निलंबित केले. मात्र, कोर्टाची पायरी चढल्यानंतर त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
न्यायालयासमोर घडलेली घटना मांडताना वकीलांसह इतरांना कोर्टाच्या खोलीबाहेर पाठविण्यात यावे, अशी रिजू बाफना यांनी कोर्टाला विनंती केली. कारण, त्यांच्यासमोर संपूर्ण घटना मांडणे अशक्य आहे. त्यावर मात्र, वकीलांनी आक्षेप घेतला आणि म्हणाले तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये अधिकारी असाल, पण हे कोर्ट आहे. तुम्ही येथे अधिकारी नाहीत.
बाफना म्हणाल्या, की विनयभंगाप्रकरणी एखादी महिला स्टेटमेंट देत असेल तर इतर पुरुष उपस्थित नसावे याकडे कोर्टाने लक्ष द्यायला हवे. त्यावर ते म्हणाले, की तुम्ही तरुण आहात. त्यामुळे अशा बाबींची मागणी करीत आहात.
महिलांच्या समस्यांवर देश असंवेदनशील आहे. या देशात कोणतीही महिलेने जन्म येऊ नये. प्रत्येक ठिकाणी मुर्खच भेटतात, असेही बाफना म्हणाल्या.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, रितू बाफना यांची फेसबुक पोस्ट....