आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Actress Khushi Mukharji,Molesting, Film SATTA PARIVARTAN

दाक्षिणात्य अभिनेत्रीचा आरोप - रुममध्ये घुसून हॉटेल स्टाफने केली छेडछाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे एका बॉलिवूड चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रीकरणासाठी दाक्षिणात्य अभिनेत्री खुशी मुखर्जी येथे आली आहे. तिने हॉटेल स्टाफने छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.
हॉटेल विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. बॉलिवूड चित्रपटाच्या शुटींगसाठी खुशी 15 दिवसांपासून भोपाळमध्ये आहे. तामिळ चित्रपट अंजलतुरई आणि डोंगाप्रेमा व हार्ट अटॅक या नंतर खुशी प्रथमच बॉलिवूड चित्रपटात झळकत आहे.
अभिनेत्रीचा आरोप
अभिनेत्री खुशी मुखर्जीने आरोप केला आहे, की शुक्रवारी ती तिच्या रुममध्ये झोपलेली होती. तेव्हा दीपक नावाचा हॉटेलचा एक कर्मचारी रुममध्ये दाखल झाला. खुशीचा आरोप आहे, की तो मी थांबले होते त्या रुममध्ये आला आणि मला स्पर्ष करण्याचा प्रय्तन केला. मी ओरडल्यानंतर तो तेथून पळून गेला. अभिनेत्रीचा आरोप आहे, की या प्रकरणात हॉटेल प्रशासनाने दोषी कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
काय आहे हॉटेलचे म्हणणे
हॉटेलचे व्यवस्थापक अब्दुल जलील म्हणाले, 'रात्री तीन वाजता रुमचा दरवाजा उघडा होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने दार बंद करण्यासाठी घंटी वाजवली मात्र आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही म्हणून तो आतमध्ये गेला.' हॉटेलाचा आरोप आहे, की अभिनेत्रीला लवकरच लोकप्रियता हवी आहे त्यासाठी हा रचलेला पब्लिसीटी स्टंट आहे.
याआधीही घडली होती अशी घटना
खुशी मुखर्जी काही दिवसांपूर्वी जखमी झाली होती. तिचा ओठ चिरला होता आणि हातालाही मार लागलेला होता. या दुर्घटनेबद्दल खुशी म्हणाली, की सकाळी घाई-घाईत मी काही निर्णय घेतला असेल किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्हाला काय घ्यायचे होते. खुशी सकाळी लवकर उठली. पहाटे आलेला फोन रिसिव्ह करण्यासाठी ती उढली होती. मात्र पलंगावरुन ती खाली पडली होती.
फोटो - हॉटेल स्टाफ विरोधात तक्रार देण्यासाठी आलेले बनसोड कुटुंब.
अभिनेत्रीचे म्हणणे आहे, की रात्री जेव्हा ती तिच्या रुममध्ये झोपलेली होती, तेव्हा हॉटेल स्टाफने तिच्या रुममध्ये घुसून तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. दुसरीकडे हॉटेल प्रशासनाने अभिनेत्रीने चीप पब्लिसीटीसाठी आरोप केल्याचा दावा केला आहे. त्यासोबतच त्यांचे म्हणणे आहे, की अभिनेत्री दारू पिऊन हॉटेलमध्ये आली होती. हॉटेल विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. बॉलिवूड चित्रपटाच्या शुटींगसाठी खुशी 15 दिवसांपासून भोपाळमध्ये आहे. तामिळ चित्रपट अंजलतुरई आणि डोंगाप्रेमा व हार्ट अटॅक या नंतर खुशी प्रथमच बॉलिवूड चित्रपटात झळकत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोलिसात तक्रार देण्यासाठी आलेली खुशी मुखर्जी