आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look The Countrys First Model Train Rake Of 120 Kmph Ready To Run

First Look-देशाची पहिली मॉडेल ट्रेन तासी 120 km धावण्‍यासाठी सज्‍ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - ही आहे देशातील पहिली अत्‍याधुनिक मॉडेल ट्रेन. तासी 120 किलोमिटर वेगात धावण्‍यासाठी ही ट्रेन सज्‍ज झाली आहे. शुक्रवारी या अत्‍याधुनिक मॉडेल ट्रेनची चाचणी घेण्‍यात आली. या रेल्‍वेच्‍या डब्यांमध्‍ये प्रवाशांना विविध प्रकारच्‍या सुविधा देण्‍यात आल्‍या आहेत. निशांतपुरा येथील रेल्‍वे कोच कार्यशाळेत ही ट्रेन तयार करण्‍यात आली असून, भोपाळ ते बीनाका बीचपर्यंत अधिका-यांच्‍या उपस्‍थितीत या रेल्‍वेची चाचणी घेण्‍यात आली. या ट्रेनच्‍या प्रवासादरम्‍यानच्‍या त्रुटींची अधिका-यांनी नोंद घेतली आहे.

रेल्‍वेत आहेत 22 कोच
भोपाळमध्‍ये असलेल्‍या या अत्‍याधुनिक मॉडेल ट्रेनला 22 कोच आहेत. प्रवाशांच्‍या सोयी सुविधा लक्षात घेऊन या रेल्‍वेला आधुनिक रूप देण्‍यात आले आहे. आरामदायक आसनव्‍यवस्‍थेसह विविध बाबींची खबरदारी घेण्‍यात आली आहे. चाचणीपूर्वी या रेल्‍वेला आकर्षक रंगही देण्‍यात आला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, मॉडेल ट्रेनची खास फोटो..