Home »National »Madhya Pradesh» Fish Man Sitaram Interesting Story Khargon Mp

अशी आहे मत्स्याला सोन्याची नथ घालणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीची गोष्ट

दिव्य मराठी वेब टीम | Oct 03, 2017, 18:39 PM IST

  • सिताराम यांनी मत्स्यास सोन्याची नथ घातली होती.
इंदूर- खरगोन येथील कसरावदमध्ये राहणाऱ्या 65 वर्षीय सिताराम केवट यांची गोष्ट एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच आहे. नर्मदा नदीलाच आपले घर मानणाऱ्या सिताराम यांच्या एका आवाजाने नदीतील मासे त्यांच्या जवळ येतात. सिताराम त्यांना आपल्या हाताने दाणे भरवतात. काही वेळ त्यांच्याही ते खेळतातही. नदीला घर आणि मासे आपले कुटुंब सदस्य मानणारे सिताराम सध्या नर्मदा यात्रेवर आहेत. ते 5 दिवसात 50 किलोमीटरची परिक्रमा नावेने करतात.
अशी आहे सिताराम केवटांची गोष्ट
- 65 वर्षीय सिताराम केवट यांचे घर नर्मदेच्या किनाऱ्यावर होते. काही वर्षापुर्वी त्यांचे घर नदीतील अतिक्रमण करत उद्धवस्त करण्यात आले. त्यानंतर केवटांनी नाव आणि नदीलाच आपले घर बनवले.
- 24 तास नदीतच राहणाऱ्या सिताराम यांची मत्स्यांसोबत इतकी मैत्री आहे की त्यांनी आवाज देताच मासे जमा होतात.
- मासे जमा झाल्यावर ते आपल्या हातात दाणे ठेवतात. त्यांच्या हातातून हे दाणे मासे खातात. मासे त्यांनी गोंजारल्यानंतर परत जातात.
मत्स्यास घातली होती सोन्याची नथ
- मागील एकादशीला त्यांचा आवाज ऐकुन अन्य मासे तर आलेच पण एक साडेसात किलो वजनाचा महाशीर मासाही त्याच्याजवळ आला होता. हा अतिशय पवित्र मासा मानला जातो. सिताराम यांनी यावेळी त्याची पूजाही केली. त्यावेळी त्यांनी एक ग्रॅम सोन्याची मोत्याची नथ त्याला घातली. ही नथ खरखोन येथील सोन्याचे व्यापारी मनिष रत्नाकर यांनी त्यांना भेट दिली होती.
नर्मदा परिक्रमेसाठी झाले रवाना
- सिताराम केवट हे नर्मदा परिक्रमेसाठी रवाना झाले आहेत. आपल्या 2 साथिदारांसोबत ते पाच दिवसात 50 किलोमीटर अंतर पार करतील. यात्रेच्या काळात ते 5 मुख्य घाटावर रात्री राहणार आहेत. ते काळात नदी घाटांची स्वच्छता करणार आहेत.
- नर्मदा परिक्रमेबाबत जीवन बाबा व भूरेलाल म्हणाले की, सिताराम यांना 15 दिवसांपूर्वी ह्दयविकाराचा धक्का बसला होता. 5 दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर ते थेट नर्मदेच्या काठावर पोहचले. तेथे त्यांनी नर्मदेची आरती केली आणि घाटाची स्वच्छता केली. त्यांनी त्यांच्या नावेत नर्मदेचा आणि हनुमानाचा फोटोही लावला आहे. यात्रेच्या काळात ते नर्मदेचा जप, हनुमान चालिसा आणि सुंदरकांडाचे वाचन करतील. दत्तात्रेय मंदिर जलकोटी, कालेश्वर-जालेश्वर, सात माता मंदिर महेश्वर, त्रिवेणी संगम, मर्कटी संगम, बडगांव गुफा आश्रम येथे ते मुक्काम करणार आहेत.
पुढील स्लाई़़डवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended