आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Killed, 30 Injured In Stampede At MP Temple

मध्‍य प्रदेशमध्‍ये रतनगड देवी मंदिरात चेंगराचेंगरी, 89 भाविकांचा मृत्‍यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्‍य प्रदेशमधील दातिया जिल्‍ह्यात रतनगड येथील देवी मंदिरात चेंगराचेंगरीमध्‍ये 89 भाविकांचा मृत्‍यू झाला आहे. आतापर्यंत 200 जण जखमी झाल्‍याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्‍याची शक्‍यता आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. मुख्‍यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेबद्दल शोक व्‍यक्त केला आहे. मृतकांच्‍या नातेवाईकांना मध्‍य प्रदेश सरकारने दिड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, देवी मंदिराजवळ एका पुलाला धडकून ट्रॅक्‍टर नदीत पडला. त्‍यामुळे चेंगराचेगरीचा प्रकार घडला. घाबरलेल्‍या भाविकांनी पळापळ सुरु केली. त्‍यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दी अनियंत्रित झाली. गर्दी आटोक्‍यात आणण्‍यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्‍यामुळे अनेक भाविकांनी नदीत उड्या टाकल्‍या. त्‍यातच पुलाचा एक भाग नदीच्‍या पाण्‍यात पडला. या सर्वप्रकारात अनेक भाविक चिरडल्‍या गेले. आतापर्यंत 24 जणांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती आहे.