आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकवर आदळली कार, युवतीसह कुटुंबातील 4 जण ठार, आज मिळणार होते गोल्‍ड मेडल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्‍ह्यात गुरुवारी दुपारी झालेल्‍या भीषण अपघातात 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्‍ये आई-वडिलांसह दोन तरुणींचा समावेश आहे. भरधाव कार ट्रकवर आदळली. ट्रकच्या इंधन टाकीला कारची जबर धडक बसली. त्‍यानंतर कारने पेट घेतला. कारमधील लोकांना बाहेर पडण्‍याची संधी मिळाली नाही.

असा झाला अपघात..
- मृतांमधील चारही जण इंदूरमधील आहेत.
- मृतांमध्‍ये - भगवती प्रसाद शर्मा (45), पत्‍नी सुनीता (42) मुलगी आंचल (23) व पलक (20)
- हा परिवार रेनॉल्ट कारने महाराष्‍ट्रातील वर्धा येथे येत होता.
- आंचल वर्धा मेडिकल कॉलेजची टॉपर होती.
- आंचलला आज (1 एप्रिल) गोल्‍ड मेडलने सन्मानित करण्‍यात येत होते.
- दरम्‍यान, हे कुटुंब पहाटे 5 ला इंदूरवरून वर्धा येथे निघाले.
- पांढुर्नामधील बायपासवर त्‍यांची कार समोरून येणार्‍या ट्रकला धडकली
- यामुळे ट्रकची डिझेल टाकी फुटली व दोन्‍ही वाहनांनी पेट घेतला.
धोकादायक बायपासवर होतात अपघात..
- हा बायपास अपघातांसाठी धोकादायक आहे.
- पांढुर्ना पोलिसांनी भगवती प्रसाद यांच्‍या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली.
- नातेवाईकांच्‍या माहितीनुसार भगवती प्रसाद पंडित होते.
- प्रसाद यांचे भाऊ दिल्‍लीत डॉक्‍टर आहेत. दाने भाऊ इंदूरमध्‍ये दुधाचा व्‍यवसाय करतात.
त्‍यांची लहान मुलगी पलक मुंबईत पत्रकारितेचे शिक्षण घेत होती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या अपघाताचे फोटो PHOTOS