आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO & PICS: अतिशहाणपणा नडला, बघता बघता पूरात वाहून गेला दुचाकीस्वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पूल पार करताना असा वाहून गेला युवक.)
भोपाळ/ बैतुल- अंत्यसंस्कारासाठी तुप घेऊन जात असलेला युवक माचना नदीवर असलेल्या करबला पुलावरुन दुचाकीसह पूरात वाहून गेला. ही घटना बैतुल जिल्ह्यातील खेडी परतवाडा या गावात घडली. या युवकाचा नदीत शोध घेण्यात येत आहे.
या युवकाचे नाव ज्ञानदेव थोटेकर असे आहे. तो भैसदेही गावाचा रहिवासी आहे. ज्ञानदेव बैतुलला आला होता. तेथून त्याने अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी तुप विकत घेतले होते. तुपाचा डबा घेऊन तो जात होता. पूलावरून जात असताना स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने ऐकले नाही. पूरात गाडी घातली. बघता बघता तो बाईकसह वाहून गेला.
पुढील स्लाईडवर बघा या थरारक घटनेची छायाचित्रे....