आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fog Disturb Train And Aviation Traffic In North India

धुक्याने अनेक ट्रेन रद्द, मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये विमानांचे मार्ग बदलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/भोपाळ- डोंगराळ प्रदेशात तापमान बरेच खाली गेल्याने उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. लेहमध्ये (J&K) उणे 14.2 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. दिल्लीत धुक्याने 45 ट्र्रेन रद्द करण्यात आल्या असून 14 ट्रेन उशीराने धावत आहेत. विमानांच्या उड्डाणांवरही या वातावरणाचा परिणाम झाला आहे. भोपाळला जाणाऱ्या काही विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे. जयपूरमध्येही विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
देशभर असे राहिले हवामान
- दिल्लीत आज सकाळी जरा धुके होते. हिमाचल प्रदेशात तापमान सामान्यपेक्षा 4 डिग्री कमी रेकॉर्ड करण्यात आले.
- हिमाचल प्रदेशातील केलांगमध्ये तापमान 4.6 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. शिमल्यात पारा 4.8 डिग्री खाली राहिला.
- मनालीमध्ये किमान तापमान उणे 2.6 डिग्री आणि काल्पामध्ये उणे एक डिग्री सेल्सियस रेकॉर्ड करण्यात आले.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम
- धुक्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि बिहार येथून येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.
- कडाक्याचे थंडीने आणि धुक्याने बससेवेवरही परिणाम झाला आहे.
जयपूरमध्ये सिजनमधील सर्वांत थंड रात्र
- जयपूरमध्ये काल या सिजनची सर्वांत थंड रात्र होती. तापमान 8 डिग्रीने खाली येऊन 4 पर्यंत स्थिरावले.
- काश्मिर आणि लडाखमध्ये पारा खाली आला. गार हवेचा प्रभाव जाणवत आहे.
- लेहमधील तापमान सात डिग्री खाली आले.
- श्रीनगरमध्ये थंडीमुळे दल सरोवर आणि इतर ठिकाणी पाणी गोठलेच राहिले.
देशातील प्रमुख शहरांचे तापमान (डिग्री सेल्सियसमध्ये)
सिटीकमालकिमान
जयपूर21.24
भोपाळ23.8
12.4
दिल्ली17.211.4
चंदिगड13.19.8
इंदूर25.211.5
पाटणा24.411.2
रायपूर28.916.1
लखनौ228
रांची27.212.1
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, उत्तर पसरलेल्या थंडीच्या लाटेचे फोटो... भोपाळमध्ये धुक्याची चादर....