आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो वाचकांनी दिला शेतकऱ्यांना आधार, २५० टन धान्याचे दान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘भास्कर’च्या अन्नदान मोहिमेला वाचकांनी भरभरून पाठिंबा दिला आहे. गरजवंतांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतो, याचा प्रत्यय वाचकांनी दिला. या मोहिमेत २५० टन धान्य जमा झाले आहे. चंदिगड आणि इंदूर येथून धान्याचे दोन ट्रक मराठवाड्याकडे रवाना झाले आहेत. लवकरच इतर शहरांतूनही ट्रक रवाना होतील.

राजस्थानच्या वाचकांनी आतापर्यंत ६३ टन धान्य जमा केले आहे. मध्य प्रदेशमध्ये ५० टन आणि महाराष्ट्राच्या वाचकांनी २९ टन धान्य शेतकऱ्यांसाठी दान केले . दुसरीकडे, गुजरात,पंजाब आणि हरियाणामध्येही वाचक अन्नदान करत आहेत. चंदिगडच्या वाचकांनी पाठवलेले धान्य मराठवाड्यासाठी रवाना करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची अवस्था : एकीकडे पिकाचे नुकसान तर दुसरीकडे बँक आणि सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येची समस्या गंभीर आहे. राज्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये जलसाठा अत्यंत कमी आहे. ४६ मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी पाहता आगामी काळात गंभीर पाणीटंचाईची शक्यता आहे. दुष्काळामुळे पिके जवळपास नष्ट झाली आहेत. अशा विदारक अवस्थेत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. धान्य दान करून तुम्हीही शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देऊ शकता. अन्नदानासाठी इच्छुकांना दैनिक दिव्य मराठी कार्यालयात संपर्क साधता येईल.